शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

देशातील बहुतांश विमानतळे तोट्यात, २५ विमानतळांचे खासगीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 10:03 IST

नवी मुंबईसह २५ विमानतळांचे खासगीकरण

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : कोविडनंतर वाहतूक वाढल्याने २०२३-२५ या कालावधीत नागपूरसह आणखी २५ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे. दहा ग्रीनफिल्ड विमानतळांपैकी दुर्गापूर, कन्नूर, सिंधुदुर्ग आणि मोपा संबंधित राज्य सरकारांनी खासगी विकासकांच्या मदतीने विकसित केले आहेत. जेवर, भोगापुरम, नवी मुंबई, कराईकल आणि डबरा येथील नवीन ग्रीनफिल्ड विमानतळांचा विकासदेखील खासगी ऑपरेटर्सना देण्यात येत आहे.देशातील विमानतळांची संख्या गेल्या नऊ वर्षात दुप्पट करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊ शकतात. नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे शेतकऱ्यांसाठी किसान उडान सुरू करण्याचा विचार करत आहेत. परंतु, पुणे, कोलकाता आणि गोवा तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) नियंत्रणाखालील १२४ विमानतळांपैकी बहुतांश विमानतळांना गेल्या पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. 

एएआयचा गेल्या पाच वर्षातील तोटा ५२८५ कोटी रुपयांचा आहे. या काळात पुणे (महाराष्ट्र), कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि गोवा यांनी नफा कमावला नसता तर तोटा गगनाला भिडला असता. २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये कोविड महामारीमुळे ही तीन विमानतळेही तोट्यात होती. या विमानतळांनी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२० दरम्यान प्रचंड नफा कमावला.

अकोला, जळगाव, जुहू, कोल्हापूर आणि सोलापूरसह एएआयकडून चालवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व  विमानतळांना सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. तिरूपती, अमृतसर, चंदीगड, हैदराबाद, जोधपूर, शिमला, श्रीनगर आणि यांसारखी काही लोकप्रिय पर्यटन स्थळांचा विमान प्रवास गेल्या पाच वर्षांपासून तोट्यात आहे. २०१८-२०२० मध्ये नफा कमावल्यानंतर २०२०-२१ मध्ये १४ खासगी विमानतळांनादेखील १८४७ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळ