शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

"कोथरूडमधूनच सर्वाधिक 'लीड' मिळेल.." आमदार रवींद्र धंगेकरांचा जबराट 'कॉन्फिडन्स'; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 12:10 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि. ४) जाहीर होणार आहे. या निकालाचे काउंटडाउन सुरू झाले असून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांमध्ये धाकधूक सुरू झाली आहे....

पुणे : लोकसभा निवडणूक निकालासाठी काही तास शिल्लक आहेत. उद्या (मंगळवार, ४ जून) सायंकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे मैदानात आहे. पण खरी लढत मोहोळ आणि धंगेकर यांच्यामध्येच झाली. निकाल काही तासांवर आला असताना धंगेकरांनी विजयाची खात्री असल्याचे सांगितले. मला कोथरूड विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक लीड मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.

यावेळी धंगेकर म्हणाले, भाजपने लोकांची कामे केली नाहीत. कोथरूडकरांच्या अडचणी सोडविण्यात भाजप अपयशी ठरले आहे. उद्याच्या निकालात मला कोथरूडमधून भरभरून मतदान होईल. त्यामुळे मुरलीधर मोहोळांचे कार्यक्षेत्र असलेल्या कोथरूडमधून मोठे मतदान मविआला मिळेल असा दावा धंगेकरांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि. ४) जाहीर होणार आहे. या निकालाचे काउंटडाउन सुरू झाले असून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांमध्ये धाकधूक सुरू झाली आहे. पुणे लोकसभा मतदारात महायुतीचे उमेदवार मुरलीधर माेहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर या दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. धंगेकरांनी विजयाचा दावा करत कोथरूडमधून लीड मिळेल असं सांगितले.

पुणे लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे, ‘एमआयएम’चे अनिस सुंडके यांच्यात मुख्य लढत झाली. पुणे लाेकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान झाले. या निवडणुकीसाठी ५३.५४ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :pune-pcपुणेravindra dhangekarरविंद्र धंगेकरmurlidhar moholमुरलीधर मोहोळVasant Moreवसंत मोरेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४