शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापेक्षा ‘सारी’चे रुग्ण अधिक ; ससून रुग्णालयाची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 11:01 IST

१५ हजाराहून अधिक सारी व अन्य आजाराचे रुग्ण

ठळक मुद्दे३१ आॅक्टोबरपर्यंत ससून रुग्णालयात सुमारे २१ हजार रुग्ण दाखल

राजानंद मोरेपुणे : ससून रुग्णालयाच्या आवारातील कोविड रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनाच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या सारी व अन्य आजार असलेल्या रुग्णांचेच प्रमाण मोठे असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत रुग्णालयात सुमारे २१ हजारांहून अधिक संशयित रुग्ण दाखल करण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४ हजार ८०० रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर उर्वरित रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण सारीचे रुग्ण असून इतरांनाही ताप, खोकला अशी लक्षणे होती.

ससून रुग्णालयामध्ये मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्ण दाखल करण्यास सुरूवात झाली. सुरूवातीला महापालिका यंत्रणा व खासगी रुग्णालयांमधून रुग्ण पाठविण्यात येत होते. काही दिवसांतच ससूनमध्ये फ्लु ओपीडी सुरू करण्यात आली. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लक्षणे असलेल्या रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात येऊ लागले. तर लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येत होते. ससूनच्या नवीन ११ मजली इमारतीमध्ये लक्षणे असलेल्या पण कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेले रुग्ण अधिक असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यात आला आहे. 

रुग्णालयाच्या अहवालानुसार, दि. ३१ आॅक्टोबरपर्यंत रुग्णालयात सुमारे २१ हजार रुग्ण दाखल झाले आहेत. या सर्वांना कोरोनाचे काही ना काही लक्षणे होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४ हजार ८०० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. उर्वरीत १५ हजार २०० जण निगेटिव्ह असले तरी त्यांना ‘सारी’ची श्वास घेण्यास त्रास, ताप, खोकला आदी लक्षणे होती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार करण्यात आले. त्यापैकी काही रुग्णांना आॅक्सिजन व व्हेंटिलेटरचीही गरज भासली. ------------‘सारी’ म्हणजे काय?सिव्हीअर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस (सारी) म्हणजे श्वसनमार्गाचा संसर्ग. यामध्ये रुग्णाला श्वास घेण्यास त्रासासह ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे आढळतात. हीच लक्षणे कोविडचीही आहेत. त्यामुळे सध्या रुग्णालयांमध्ये दाखल झालेले या लक्षणांचे सर्व रुग्ण कोरोना संशयितांमध्ये पकडले जातात. प्रयोगशाळा अहवाल निगेटिव्ह आलेले व अशी लक्षणे असलेले बहुतेक रुग्ण सारी म्हणून ग्राह्य धरले जातात, असे ससूनमधील तज्ज्ञांनी सांगितले.----------ससून कोविड रुग्णालयातील स्थिती (दि. ३१ आॅक्टोबरपर्यंत)एकुण दाखल रुग्ण - २०,९०९एकुण कोरोनाबाधित रुग्ण - ४,८४२एकुण सारी व तत्सम लक्षणे असलेले रुग्ण - १५,२५९------------------ससून रुग्णालयात दाखल झालेल्या संशयित रुग्णांमध्ये अधिकाअधिक रुग्ण सारीचे आहेत. तसेच इतर रुग्णांना कोणते ना कोणते लक्षण होते. कोरोना निगेटिव्ह किंवा लक्षणे नसलेले संशयित रुग्ण सुरूवातीपासूनच दाखल करून घेत नाही. लक्षणे असलेले संशयित रुग्ण सर्व विभागातील आहेत. संशयितांसाठी स्वतंत्र वॉर्ड आहे. बहुतेक रुग्ण अन्य रुग्णालयांकडून पाठविले जातात. ससूनमधून आलेला रुग्ण उपचाराशिवाय परत पाठविला जात नाही.- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय-----------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याsasoon hospitalससून हॉस्पिटल