शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पुुणे शहर, जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मिळणार अधिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 12:11 IST

जिल्हाधिकाऱ्यांची पावणेसहा कोटींची मागणी

ठळक मुद्देजिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातदेखील पूरग्रस्तांना मदत करण्याची मागणी

पुुणे : शहर व जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरून झालेल्या नुकसानासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये शासनाने आर्थिक मदत केली आहे. शासनाच्या आदेशानुसार ही मदत आता शहरी भागात प्रत्येकी १५ हजार व ग्रामीण भागात प्रत्येकी १० हजार रुपये केली आहे. पूरग्रस्तांना अधिक मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य शासनाकडे ५ कोटी ६१ लाख ८० हजारांची मागणी केली आहे. ही मदत आल्यानंतर त्वरित पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करू, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी दिली.पुणे शहरातील तब्बल ९ हजार ३१५, पिंपरी-चिंचवड  येथील ४ हजार ८८०, हवेली ग्रामीण २ हजार ३६३ नागरिकांना फटका बसला. तर, ग्रामीण भागात बारामती ७७१, भोर २१, दौंड ९८४, इंदापूर २१९, मावळ १४, मुळशी १२४, पुरंदर २८२, शिरूर १३१ अशा एकूण १९ हजार २२० नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातदेखील पूरग्रस्तांना मदत करण्याची मागणी केली. त्यानुसार शासनाने प्रत्येकी ५ हजार रुपये मदत करण्याची घोषणा केली. शासनाने २१ कोटी ८७ लाख ७० हजारांची मदत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाने पंचनामे करून या मदतीचे वाटप केले. त्यानंतर नागरिकांनी अधिक मदत करण्याची मागणी केली. त्यानुसार शहरी भागात प्रत्येकी १५ हजार रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रत्येकी १० हजार रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला. आता ५ कोटी ६१ लाख रुपयांची आवश्यकता असून, शासनाकडून निधी आल्यास त्वरित त्याचे वाटप सुरू करण्यात येईल.......अनेकांची घरे पाण्यातपुणे शहर आणि जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले, पावसामुळे अनेकांची घरे, संपूर्ण संसार पाण्यात गेला. 

टॅग्स :PuneपुणेfloodपूरFarmerशेतकरीGovernmentसरकारcollectorजिल्हाधिकारी