शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीनिमित्त पीएमपीच्या जादा बस; पाषाण, नसरापूर, निळकंठेश्वर, धायरेश्वर, सोमेश्वरवाडीकडे बस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 05:07 IST

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत विशेष बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बस स्वारगेट, नेहरू स्टेडियम, मनपा भवन येथून सोडल्या जाणार आहेत.

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत विशेष बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बस स्वारगेट, नेहरू स्टेडियम, मनपा भवन येथून सोडल्या जाणार आहेत.महाशिवरात्रीनिमित्त दि. १३ फेब्रुवारी रोजी ‘पीएमपी’कडून सोमेश्वरवाडी (पाषाण), बनेश्वर (नसरापूर), निळकंठेश्वर (रूळे) व धायरेश्वर मंदिर (धायरी) या ठिकाणी जाण्यासाठी विशेष बस सोडल्या जाणार आहेत. स्वारगेट ते बनेश्वर, नेहरू स्टेडियम ते रूळेगाव, मनपा भवन ते पाषाण आणि स्वारगेट नटराज हॉटेल ते धायरी हे मार्ग असतील. स्वारगेट बसस्थानकातून पहाटे ३.३० वाजता रुळेगावपर्यंत तर बनेश्वरसाठी सकाळी ६ वाजता पहिली बस सोडली जाणार आहे.दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातूनही शिवरात्रीनिमित्त जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांना दर्शनासाठी इच्छित स्थळी जाता येणार आहे.मनपा भवन येथून सोमेश्वरवाडीसाठी पहिली बस सकाळी ६ वाजता सोडली जाणार आहे. रूळेगाव याठिकाणी विशेष बससेवा देण्यात येणार असल्याने या मागावरील प्रवाशांसाठी नेहमीच्या दरापेक्षा २५ टक्के जादा दराची आकारणी करण्यात येईल. पासधारकांना या मार्गावर सवलत मिळणार नाही, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल