पीएमपीच्या ताफ्यात आणखी ३० मिडी बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:57 IST2018-03-19T00:57:43+5:302018-03-19T00:57:43+5:30
महिलांसाठीच्या ३० तेजस्विनी बसपाठोपाठ पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात आणखी ३० मिडी बस दाखल झाल्या आहेत.

पीएमपीच्या ताफ्यात आणखी ३० मिडी बस
पुणे : महिलांसाठीच्या ३० तेजस्विनी बसपाठोपाठ पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात आणखी ३० मिडी बस दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी १२ बस मार्गावर आल्या असून, १८ बसच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या बसही पुढील दोन-तीन दिवसांमध्ये मार्गावर येणार असल्याची माहिती पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
‘पीएमपी’च्या ताफ्यात एकूण २०० मिडी बस येणार असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. त्यापैकी ३० बस महिला दिनापासून मार्गावर आल्या आहेत. तेजस्विनी नावाने सुरू करण्यात आलेल्या या बस ‘महिला विशेष’ म्हणून मार्गावर धावत आहेत.
या बसना गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. आता आणखी बस ताफ्यात येऊ लागल्या आहेत. महिनाअखेरपर्यंत एकूण ९९ बस मार्गावर आणण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. सध्या ३० महिला विशेष बससह दोन दिवसांपूर्वी आणखी १२ बस मार्गावर धावत आहेत, तर कंपनीकडून आणखी १८ बस पीएमपीला मिळाल्या आहेत. या बसच्या नोंदणीचे काम प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून केले जात आहे.