दीडशेहून अधिक जनावरांचा फडशा
By Admin | Updated: February 15, 2017 01:15 IST2017-02-15T01:15:09+5:302017-02-15T01:15:09+5:30
गेल्या एकदोन वर्षांपासून राहूबेट परिसरात बिबट्याचे जनावरांवरील हल्ले वाढले आहे

दीडशेहून अधिक जनावरांचा फडशा
पाटेठाण/राहू : गेल्या एकदोन वर्षांपासून राहूबेट परिसरात बिबट्याचे जनावरांवरील हल्ले वाढले आहे. आत्तापर्यंत राहू, पिलाणवाडी, पाटेठाण, देवकरवाडी, टाकळी भीमा परिसरातील सुमारे शंभर ते दीडशेहून अधिक शेळ्या, मेंढ्या, कालवडी या जनावरांचा फडशा पाडत जणू धुमाकूळच घातला आहे. वनविभागाला दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. हल्ले भीतीदायक बाब असून, यावर उपाययोजनेची ग्रामस्थांनी केली आहे.