शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

मोरया!मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडुशेठ गणपतीला तब्बल ६१ किलोंचा मोदक अर्पण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 16:17 IST

गणपती बाप्पा मोरया! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून दगडुशेठ गणपतीला तब्बल ६१ किलोचा मोदक अर्पण  

पुणे : आगामी काळात होणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार 'होर्डिंग वॉर' बघायला मिळाले होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मंगळवारी (दि. २७ जुलै) वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शिवसेनेच्यावतीने प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीला तब्बल ६१ किलोंचा मोदक अर्पण करण्यात आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुण्यात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसह पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीला तब्बल ६१ किलोंचा मोदक अर्पण केला आहे. यावेळी गोऱ्हे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसह महाआरती देखील केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ६१ वर्षे पूर्ण केल्याबद्दल शिवसेना पुणे शहराच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे. तसेच कोरोना व नैसर्गिक आपत्तीविरूद्ध लढण्याचे बळ मिळावे आणि पीडितांची सेवा करण्याचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना देखील करण्यात आली. 

गोऱ्हे म्हणाल्या, कोरोना महामारी व नैसर्गिक आपत्ती यांच्यातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारला ताकद मिळावी. आणि ह्या सरकारला जनतेच्या सेवेची अधिकाधिक संधी मिळत राहो. तसेच राज्यातील सर्व मंदिरं लवकरात लवकर उघडण्यासाठी सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण तयार व्हावे.  महाराष्ट्रासह संपूर्ण जगावरील कोरोना संकट दूर व्हावं. अतिवृष्टीमुळे जे दगावले गेले आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी. सर्व पूरग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, या नैसर्गिक आपत्तीमधून सुटका होण्यासाठी जास्तीत जास्त बळ, शक्ती आणि सेवेची संधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आमच्या सरकारला मिळावी. 

याप्रसंगी रवींद्र मिर्लेकर,संपर्कप्रमुख बाळाभाई कदम ,शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे,राजेंद्र शिंदे,अशोक हरणावळ,नगरसेविका पल्लवी जावळे,संगीता ठोसर,उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेDagdusheth Templeदगडूशेठ मंदिरganpatiगणपतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNeelam gorheनीलम गो-हे