शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

चंद्र ग्रहणाचे वेध लागण्यापूर्वी माघी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 19:59 IST

आज चंद्राला ग्रहण असल्याने ग्रहणाचे वेध सुरू होण्याआधीच माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त भाविकांनी मेदनकरवाडी व खरपुडी येथे खंडोबाच्या दर्शनाला पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.

- हनुमंत देवकरचाकण : आज चंद्राला ग्रहण असल्याने ग्रहणाचे वेध सुरू होण्याआधीच माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त भाविकांनी मेदनकरवाडी व खरपुडी येथे खंडोबाच्या दर्शनाला पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. माघी पौर्णिमेनिमित्त खेड तालुक्यातील खरपूडी, मेदनकरवाडी व चाकण येथील खंडोबा माळावर लाखो भाविकांनी आज खंडोबाचे मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. तालुक्यातील सर्वात मोठी ही यात्रा असून भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. 'खंडोबाच्या नावानं चांगभलं, सदानंदाचा येळकोट' चा गजर करीत भाविकांनी खंडोबा मंदिरात भंडार, खोबऱ्याची तळी भरून उधळण केली.मेदनकरवाडीत सकाळी खंडोबाची पूजा करून हारतुरे व मांडव डहाळे काढण्यात आले. दुपारी दोन वाजता बैल गाड्यांची मिरवणूक काढून यात्रेत विशेष महत्व असलेल्या देवाच्या बारा गाड्याचा कार्यक्रम झाला. या गाड्याला इतर गाडे जोडून भाविक भक्त करंगळी लावून गाडे ओढतात. हे गाडे पाहण्यासाठी खेड, हवेली, मावळ व शिरूर तालुक्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. परिसरातील भाविक परंपरेनुसार अजूनही बैलगाडीतून दर्शनाला येतात. दुपारी तीन ते सहा या वेळेत कुस्त्यांचा आखाडा पार पडला. सर्व ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या पदाधिकार्यांनी यात्रेत चोख प्रशासन व्यवस्था ठेवली. देवाचे पुजारी भुजबळ यांनी गाभाऱ्यात शिस्तीत भाविकांचे देवदर्शन करून घेतले.श्री क्षेत्र खरपुडी येथे माघी पौर्णिमेनिमित्त कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली. "सदानंदाचा येळकोट"चा जयघोष, भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत श्रींची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी सहा वाजता खंडोबाची पूजा, अभिषेककरून कुलदैवताच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. पालखीची गावामधून मिरवणूक काढून गडावर आणण्यात आली. मिरवणुकीमध्ये ग्रामस्थांसह भाविक सहभागी झाले होते. खरपुडीच्या गडावर भाविकांनी व नवविवाहित दाम्पत्यांसाठी वाघ्या मुरळींनी संबळ व दिमडीच्या ठेक्यावर खंडोबाची गाणी म्हणत जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला. पुणे जिल्ह्यासह, मुंबई, ठाणे, संगमनेर, नगर जिल्ह्यातील भाविकांनी खंडेरायाच्या दर्शनासाठी खरपुडी येथे गर्दी केली होती. भाविकांना दर्शन घेण्यासाठी दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली होती. महोत्सव सुलभ होण्यासाठी यात्रा कमिटी च्या संयोजनाखाली ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

टॅग्स :Puneपुणे