शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत हाेणार आण्णाभाऊ साठे यांचं स्मारक ; दिलीप कांबळे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 18:37 IST

मुंबईतील घाटकाेपरमधील चिराग नगरी येथील आण्णाभाऊंचं राहतं घर आणि त्याच्या आजूबाजूच्या 7 हेक्टर जागेमध्ये आण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक राज्य सरकार करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे : मुंबईतील घाटकाेपरमधील चिरागनगरी येथील आण्णाभाऊंचं राहतं घर आणि त्याच्या आजूबाजूच्या 7 हेक्टर जागेमध्ये आण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक राज्य सरकार करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्र्यांसाेबत साेमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

साेमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत आण्णाभाऊ साठे यांचं मुंबईत भव्य स्मारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आण्णाभाऊ साठे यांचं मुंबईतील चिरागनगरी येथील घर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात हे स्मारक हाेणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी असलेल्या नागरिकांचे पूनर्वसन करण्यात येणार आहे. हे स्मारक खासगी कंपनीकडून न करता म्हाडा, शिवशाही प्रकल्प, एमएमआरडीए यांच्या मदतीने करण्यात येणार आहे. या स्मारकामुळे बाधीत हाेणाऱ्या 700 घरांचे पुनर्वसन त्याच भागात करण्यात येणार आहे. 2020 हे आण्णाभाऊ साठे यांचं जन्म शताब्दी वर्ष आहे, त्याच्या आत स्मारकाचं काम सुरु करण्यात येणार असल्याचेही कांबळे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Dilip Kambleदिलीप कांबळेPuneपुणेMumbaiमुंबई