शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभर ‘खिचडी’त तूरडाळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 03:12 IST

पोषण आहार अधीक्षकांची शिक्षण समितीत तक्रार

पुणे : एकीकडे तूरडाळीचे उत्पादन वाढल्याचे अन्नधान्य पुरवठामंत्र्यांनी गेल्या वर्षी जाहीर केले होते. मात्र, जिल्ह्यात पोषण आहाराच्या खिचडीसाठी लागणाऱ्या तूरडाळीचा पुरवठा होत नसल्याची तक्रार सर्व तालुक्यांतील शालेय पोषण आहार अधीक्षकांनी शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत केली आहे. गेल्या जूनपासून तूरडाळीचा पुरवठा होत नसल्याने पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.दोन वर्षांपूर्वी तूरडाळीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाला झाला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात डाळीचे भाव गगनाला भिडले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात डाळीचे उत्पादन झाल्याने डाळ कमी पडणार नाही, अशी माहिती अन्न व पुरवठा मंत्र्यांनी केले होते. मात्र, पुणे जिल्ह्यातील शाळांना पोषण आहार शिजवण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून डाळीचा पुरवठा होत नसल्याची तक्रार जिल्ह्यातील सर्व शालेय पोषण आहार अधीक्षकांनी जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्याकडे केल्या. गेल्या वर्षी तूरडाळीचा पुरवठा हा शासकीय संस्थेमार्फत करण्यात यावा, असे शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ठरले होते. त्यानुसार शिक्षण संचालनालयाने काढलेल्या निविदेनुसार संपूर्ण जिल्ह्यातला मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. तर्फे तूरडाळीचा पुरवठा केला जातो. मात्र, या फेडरेशनकडून गेल्या महिनाभरापासून अनियमित पुरवठा सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांपर्यंत मागणी करूनही डाळ पोहोचली नसल्याने विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून कुठला आहार दिला जावा, याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यात तूरडाळीचा प्राधान्याने समावेश आहे. आठवड्याच्या सोमवारी, बुधवारी, आणि शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या जेवणात तूरडाळीचा समावेश आहे. यात डाळीचे वरण, सांबार, भात, आमटी भात दिला जावा, अशा सूचना शासनाच्या आहेत. मात्र, डाळींचा पुरवठाच होत नसल्याने या दिवशी काय शिजवावे,हा प्रश्न शालेय पोषण आहार अधीक्षकांना पडला आहे.

आठवड्याच्या इतर दिवशी वाटाणा वापरून भात, कडधान्यांची उसळ, भाजी आणि आमटी दिली जाते. गुरुवारी मटकी वापरून भात, कडधान्य उसळ, भाजी आमटी तसेच मटकी डाळ दिली जाते तर शनिवारी मुगडाळ, आमटी भात असे पोषण आहाराचे नियोजन आहे.पोषण आहारात डाळीबरोबर वाटाणा, मूग, मटकी, तेल, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, मीठ, जीरे, मोहरी आणि मिरचीचाही पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. हे कंत्राट मुंबईतील महाराष्ट्र को आॅपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशनतर्फे या सर्वांचा पुरवठा केला जातो.जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत तूरडाळीचा पुरवठा होत नसल्याची तक्रार जिल्ह्यातील तालुका पोषण आहार अधीक्षकांनी केली. याची माहिती घेतली असता गेल्या महिन्याभरापासून तुरडाळीचा पुरवठा होत नसल्याची माहिती पुढे आली. याबाबत डाळ पुरविणाºया संस्थेशी संपर्क साधला असून त्यांना पुरवठा होत नसल्याबाबत कारणे विचारण्यात आली आहे. तसेच लवकरच डाळीचा पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनीही दिलगिरी व्यक्त करून लवकरच पुरवठा व्यवस्थित करण्याचे आश्वासन दिले आहे.- विवेक वळसे-पाटील, उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळा