शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून १७ जूनपर्यंत लांबणीवर, मुहूर्त गेला आणखी पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 06:30 IST

सर्वांचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे लागले असले, तरी यंदाही मान्सून हुलकावणी देणार असल्याचे चित्र आहे.

पुणे : सर्वांचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे लागले असले, तरी यंदाही मान्सून हुलकावणी देणार असल्याचे चित्र आहे. राज्यात १७ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार नाही. तसेच, जूनमध्ये सरासरीपेक्षा २०-३० टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचे अभ्यासक जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. त्यामुळे धरणसाठे जपून वापरण्याबरोबरच शेतकऱ्यांनी पेरणीची घाईदेखील करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.अंदमानमध्ये २० मेच्या सुमारास मान्सून दाखल झाला. त्यामुळे ३० मे अखेरीस केरळात आणि पुढे राज्यात मान्सून दाखल होण्याची अपेक्षा होती. मात्र, कोकण किनारपट्टी भागात मान्सूनची हजेरी यंदा लांबणार आहे. दरवर्षी साधारण ५ ते ७ जूनच्या दरम्यान हजेरी लावणारा पाऊस यंदा १२ जूननंतर कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. या वेळी पावसाचा जोर असणार नाही. गेल्या वर्षी किनारपट्टी भागात २९ मे रोजीच मान्सून दाखल झाला होता. मात्र, त्यापुढील वाटचाल झाली नव्हती. मान्सून दाखल होऊन त्याची पुढील वाटचाल कशी होते, हे महत्त्वाचे आहे. यंदा किनारपट्टी भागातच मान्सून पाच ते सहा दिवस उशिरा दाखल होत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे त्याचे राज्यातील आगमनही आणखी लांबेल, असे दिसते.दोन वर्षे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे. यंदा राज्यात टँकरद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा करावा लागत आहे. याशिवाय चारा छावण्या उभारण्याची वेळही आली.कुलकर्णी म्हणाले, मान्सूनची प्रगती अत्यंत धिम्या गतीने होत आहे. पाऊस झाल्यास तो १ सेंटीमीटरच्या आसपास राहील. हा पाऊस शेतीच्या मशागतीसाठीदेखील उपयुक्त नाही. जूनमध्ये पाऊस होणार नसल्याने धरणसाठ्याचे नियोजन केले पाहिजे.>पावसाला उशीर होण्याची कारणे काय?एल निनोची स्थिती सामान्य आहे. मान्सून सक्रिय राहण्यासाठी समुद्राचे तापमान, हवेचा वेग असे विविध घटक कारणीभूत असतात. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी २८ ते २९ डिग्री असते. हिंद महासागराच्या पूर्व भागाचे तापमान १ अंशाने कमी आणि पश्चिम भागाचे तापमान एक अंशाने जास्त असावे लागते. मान्सून पुढे जाण्यासाठी वाºयाचा वेगही योग्य असावा लागतो. आत्ता तशी स्थिती नाही. त्यामुळे जूनमधे सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल.- जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामानतज्ज्ञ

 

टॅग्स :Rainपाऊस