शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विलंबाने सुरु झालेली परती; अंदाजापेक्षा आॅगस्टमध्ये कमी पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 15:32 IST

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाचा अहवाल हवामान विभागाने जाहीर केला आहे़ हवामान विभागाने जाहीर केल्याप्रमाणे यंदा मॉन्सूनचे केरळला वेळेवर आगमन झाले होते़ पण, त्यानंतर त्याचे वितरण असमान राहिले़ 

ठळक मुद्देचार महिन्यांचा एकूण पाऊस पाहता हवामान विभागाने जाहीर केल्याप्रमाणे देशभरात ९५ टक्के पाऊस पडला आहे़उत्तर भारतात आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पाऊसमान कमी राहिले़ 

पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याच्या प्रमाणात झालेली घट, मॉन्सूनच्या परतीला तीन आठवडे विलंबाने सुरुवात, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजापेक्षा आॅगस्टमध्ये कमी झालेला पाऊस आणि त्यामुळे धान्याचे कोठार असलेल्या उत्तर भारतात सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस हे यंदाच्या मॉन्सूनचे वैशिष्ट्य ठरले आहे़ जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाचा अहवाल हवामान विभागाने जाहीर केला आहे़ हवामान विभागाने जाहीर केल्याप्रमाणे यंदा मॉन्सूनचे केरळला वेळेवर आगमन झाले होते़ पण, त्यानंतर त्याचे वितरण असमान राहिले़ देशभरातील चार महिन्यांचा एकूण पाऊस पाहता हवामान विभागाने जाहीर केल्याप्रमाणे देशभरात ९५ टक्के पाऊस पडला आहे़ हवामान विभागाने ६ जूनला देशभरात ९८ टक्के पाऊस पडेल व त्यात ४ टक्क्यांचा कमी किंवा जास्तीचा फरक पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला होता़ प्रत्यक्षात ९५ टक्के पाऊस पडला़ जुलैमध्ये ९६+_९टक्के (अधिक अथवा कमी) तसेच आॅगस्टमध्ये ९९+_९ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता़ पण, प्रत्यक्षात जुलैमध्ये १०२ टक्के तर आॅगस्टमध्ये ८७ टक्के पाऊस पडला़ आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये देशभरात १०० +_ ८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने ८ आॅगस्ट रोजी व्यक्त केला होता़ पंरतु, प्रत्यक्षात केवळ ८७ टक्के पाऊस पडला़ संपूर्ण देशभरात ५ टक्के पाऊस कमी होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कमी झालेला पाऊस होय़पावसाळ्याच्या चार महिन्यात दरवर्षी साधारणपणे ६ तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आणि ८ कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत असतात़  यंदाही १४ वेळा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असले तरी त्यात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र केवळ जूनमध्ये एकदाच निर्माण झाले़ तर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन महिन्यात निर्माण झाले नाही़ जून व जुलैमध्ये एकूण ५ वेळा द्रोणीय स्थिती निर्माण झाली होती़ त्यामुळे जून, जुलैमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला़ आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये केवळ ३ वेळा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते़ त्याचा परिणाम उत्तर भारतात या दोन महिन्यात पाऊसमान कमी राहिले़ देशाच्या ३६ हवामान विभागापैकी २५ विभागात आणि देशात ६५ टक्के क्षेत्रात सर्वसाधारण पाऊस झाला असला तरी ११ विभागात तो सरासरीपेक्षा कमी आहे़ देशातील ५ विभागात आणि एकूण क्षेत्रफळाच्या १७ टक्के परिसरात सरासरीपेक्षा २० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे़ तर ६ विभागा आणि १७ टक्के क्षेत्रफळावर सरासरीपेक्षा २० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात कमी पाऊस झाला आहे़ त्यात विदर्भ, पश्चिम व पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश यांचा समावेश आहे़ 

टॅग्स :RainपाऊसPuneपुणे