एचसीएमटीआरमध्ये मोनोरेलचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 04:05 IST2015-12-31T04:05:41+5:302015-12-31T04:05:41+5:30
शहरातील उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाच्या (एचसीएमटीआर) आराखड्यामध्ये मोनोरेलचा समावेश करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे वाहतूककोंडी

एचसीएमटीआरमध्ये मोनोरेलचा समावेश
पुणे : शहरातील उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाच्या (एचसीएमटीआर) आराखड्यामध्ये मोनोरेलचा समावेश करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे वाहतूककोंडी सुटण्यास व सार्वजनिक व्यवस्था सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे.
महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी एचसीएमटीआरची आढावा बैठक घेतली. या बैठकीला उपमहापौर आबा बागुल, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, नगर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते. एचसीएमटीआर प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करणे, त्यानंतर एक महिन्यात आराखडा तयार होणार आहे. त्यामध्ये मोनोरेलच्या समावेशाचा निर्णय घेण्यात आला. शहराच्या ४ दिशांनी वर्तुळाकार असा उच्च क्षमतेचा ३४ किलोमीटरचा मार्ग याअंतर्गत उभारण्यात येणार आहे. एचसीएमटीआर मार्ग विकसित करण्यासाठी भूसंपादनाकरिता टीडीआरच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली. कार्यवाहीची सूचना कुणाल कुमार यांनी केली. एचसीएमटीआर मार्गाबाबत या वेळी चर्चा करण्यात आली.