शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

मंकी हिल, नागनाथ बोगद्याचे काम नव्या वर्षात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 11:17 IST

मुंबईला जाणाऱ्या खचलेल्या रेल्वेमार्गाचे काम हे वेगाने सुरू

ठळक मुद्दे पाऊस खूप काळ सुरू राहिल्यामुळे कामात अनेक अडथळेयेत्या १५ जानेवारी पर्यंत काम पूर्ण होवून या मार्गावरून सर्व रेल्वे गाड्या धावणार दिवस-रात्र काम सुरू ; धोकादायक डोंगरासाठी स्वतंत्र यंत्रणा 

तेजस टवलारकर - लोणावळा : मागील काही महिन्यांमध्ये सातत्याने झालेल्या पावसामुळे मंकी हिल ते नागनाथ बोगदा हा रेल्वे मार्ग खचला होता. त्यामुळे या मार्गावरून पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या गाड्यांसह अन्य काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. सध्या मात्र मुंबईला जाणाऱ्या खचलेल्या रेल्वेमार्गाचे काम हे वेगाने सुरू असून येत्या १५ जानेवारी पर्यंत काम पूर्ण होवून या मार्गावरून सर्व रेल्वे गाड्या धावणार आहेत. ही माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.सुतार म्हणाले, दुरुस्ती कामामुळे ३ ऑक्टोबरपासून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे  मार्ग बदलण्यात आले आहेत. तर काही गाड्या पुण्यापर्यंत धावत आहेत. सद्यस्थितीत खचलेल्या मार्गाचे  ६०  टक्के काम पूर्ण झाले आहे. ४० टक्के काम लवकरच पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जानेवारीच्या मध्यापर्यंत हा मार्ग सुरू करण्याचे ध्येय रेल्वे प्रशासनाचे आहे. मंकी हिल ते नागनाथ बोगद्याच्या मध्यभागी एक पूल आहे. पुलाच्या शेजारचा रेल्वेमार्ग खचला होता. खचलेल्या भागात ४३  मीटरचा पूल उभारण्यात येत आहे. हा पूल जुन्या पुलाला जोडला जाणार आहे. सुमारे दीड महिन्यांपासून पूल उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी सुमारे १०  कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हे काम २४ तास सुरूच आहे. एका पाळीत ६० कामगार काम करीत आहेत. ......दुरुस्ती कामाठिकाणी एका बाजुला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी आहे. त्यामुळे वेगाने काम पूर्ण करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच पाऊस खूप काळ सुरू राहिल्यामुळे कामात अनेक अडथळे येत होते. च्तसेच लोणावळा येथून सर्व साहित्य विशेष गाडीतून घेऊन यावे लागत आहे. गाडी विशेष ठिकाणी थांबवावी लागत आहे. तेथून पुन्हा कामगारांच्या मदतीने साहित्य पुढे घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे दुरुस्ती कामाला विलंब लागत असल्याचेही सुतार यांनी स्पष्ट केले......दिवस-रात्र काम सुरू दुरुस्तीचे काम रात्रंदिवस सुरू आहे. रात्रीसाठी हॅलोजन बल्बची व्यवस्था करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस झाल्यास मार्ग खचून जाऊ नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानचा वापर केला जात आहे. या कामासाठी कोकण विभागाच्या तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचाºयांची मदत घेतली जात आहे. ......‘गॅलव्हनाइज स्टील’चे आवरण लावले पोल बोरघाट परिसर हा डोंगराळ असल्याने येथे माकडांची संख्या मोठी आहे. ही माकडे रेल्वे लाईनवरील पोलवरून ओव्हरहेड वायरवर चढतात. यामुळे अनेकदा ओढाताण होऊन वायर तुटण्याच्या घटना घडतात. परिणामी रेल्वे गाड्यांचा विद्युत प्रवाह खंडित होऊन गाड्या थांबवाव्या लागतात. ......दरम्यान, यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने घाट परिसरातील खंडाळा स्टेशन ते नागनाथ स्टेशन दरम्यान हे ट्रॅप लावण्यात आले आहेत. माकडांनी पोलवर चढू नये, यासाठी पोलच्या मध्यभागी ‘गॅलव्हनाईज स्टील’चे आवरण लावले आहे. यामुळे माकडे पोलवर चढू शकत नाहीत. माकडांनी वर चढण्याचा प्रयत्न केल्यास ते घसरून खाली पडतात........धोकादायक डोंगरासाठी स्वतंत्र यंत्रणा अतिपावसामुळे बऱ्याच ठिकाणी डोंगर पोकळ झाला आहे. पोकळ झालेल्या धोकादायक डोंगराची स्वतंत्र संघाकडून पहाणी केली जात आहे. पोकळ झालेल्या दगडाला खूण करून नंतर पोकळ झालेले धोकादायक दगड पाडले जात आहेत. मंकी हिल परिसरामध्ये सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाºया कॅच स्लाइडिंगचे काम पूर्ण झाले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कॅच स्लाईडिंग प्रभावी उपाययोजना ठरणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेKarjatकर्जतlonavalaलोणावळाpassengerप्रवासी