शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

बीआरटी मार्गांवर राहणार समितीची देखरेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 21:32 IST

समितीकडून बीआरटी मार्गाची पाहणी पुणे : शहरातील बीआरटी मार्गांवर आता स्वतंत्र समितीची नजर राहणार आहे. या मार्गांवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बीआरटी मार्ग देखभाल व दुरूस्ती समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये पीएमपी व पालिका अधिकाºयांसह प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. या समितीकडून महिन्यातून किमान एकदा बीआरटी मार्गांचा आढावा ...

ठळक मुद्देसमितीकडून बीआरटी मार्गाची पाहणी पुणे व पिंपरी चिंचवडमधील बहुतेक सर्वच बीआरटी मार्गांची दुरावस्था

समितीकडून बीआरटी मार्गाची पाहणी पुणे : शहरातील बीआरटी मार्गांवर आता स्वतंत्र समितीची नजर राहणार आहे. या मार्गांवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बीआरटी मार्ग देखभाल व दुरूस्ती समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये पीएमपी व पालिका अधिकाºयांसह प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. या समितीकडून महिन्यातून किमान एकदा बीआरटी मार्गांचा आढावा घेतला जाईल.पुणे व पिंपरी चिंचवडमधील बहुतेक सर्वच बीआरटी मार्गांची दुरावस्था झाली आहे. मार्गावर होणारी अन्य वाहनांची घुसखोरी, बसस्थानकांची दुर्दशा, असुविधा यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शहरातील सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता आणि संगमवाडी रस्त्यावरील बीआरटी मार्गासाठी स्वतंत्र देखरेख समिती स्थापन केली आहे. सद्यस्थितीत बीआरटी मार्गांवरील विविध ठिकाणी वेळोवेळी देखभाल-दुरुस्तीच्या कामांवर नियंत्रण ठेऊन उपाययोजना करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही समिती महिन्यातून किमान एकदा बैठक घेऊन मार्गांवरील देखभाल-दुरूस्तीच्या कामांचा आढावा आढावा घेईल. मार्गाबाबत आलेल्या तक्रारींचे सात दिवसांत निराकरण करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी याबाबतच्या आदेशात स्पष्ट केले आहे. समितीच्या अध्यक्षपदी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांची म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक, महापालिकेच्या पथ विभागातील दोन अभियंते, विद्युत विभागातील दोन अभियंते, नागरिक चेतना मंचच्या कणिज सुखरानी, प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी व दि इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सपोर्टेशन अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट पॉलिसी या संस्थेच्या प्रांजली देशपांडे आगाशे हे या समितीतील सदस्य असतील. समितीकडून बीआरटी मार्गाची पाहणी‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी समितीतील सदस्यांसह मंगळवारी नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष बसने प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. ---------- मार्गावरील बसस्थानकांवर बस आल्यानंतर दरवाजे उघडणे अपेक्षित आहे. मात्र, काही बसेसचे दरवाजे उघडेच राहत असल्याचे निदर्शनास आले. डिजिटल माहितीदर्शक फलक बंद आहेत. वाहनचालकांकडूनही घुसखोरी केली जात आहे.मार्गाची पाहणी करत असताना आढळून आलेल्या त्रुटींबाबत पालिका प्रशासनाला कळविण्यात आले आहे. बीआरटी मार्गासाठी पालिकेन १० कोटींचा निधी दिला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत मार्गांवरील त्रुटी दुर करण्याचा प्रयत्न केला जाईल.                                                                                                                                                     अजय चारटणकर,समिती अध्यक्ष 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे