शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

सावकारी जाच; तिघांच्या कुटुंबाने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 10:06 IST

चिखलीतील सोनवणे वस्तीत शुक्रवारी रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली. 

पिंपरी (पुणे) : सावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात मायलेकाचा मृत्यू झाला, तर पती बचावला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. चिखलीतील सोनवणे वस्तीत शुक्रवारी रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली. 

शुभांगी हांडे (वय ३६) आणि धनराज (९) अशी मृत मायलेकाची नावे आहेत. पती वैभव हांडे (४५) यांनी  फिर्याद दिली. त्यावरून संतोष कदम, संशयित महिला संतोष पवार आणि जावेद खान यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिघांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. नंतर छताच्या पंख्याला गळफास लावला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांच्या दिलेल्या माहितीनुसार, वैभव हांडे यांचे औषधी दुकान असून, त्यांनी २०१६ मध्ये संतोष कदम याच्याकडून सहा लाख रुपये, संशयित महिलेकडून दोन लाख, जावेद खान यांच्याकडून चार लाख, तर संतोष पवारकडून साडेसात लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते.

त्याबदल्यात वैभव यांनी संतोष कदम याला त्याच्या मुद्दलची परतफेड करून नऊ लाख ५० हजार रुपये आणि एक एकर जमीनही लिहून दिली होती. संशयित महिलेलाही दरमहा २० हजार रुपये देऊन २० गुंठे जमीन लिहून दिली होती, तरीही तिने १४ लाख रुपये दिल्याशिवाय जमीन परत देणार नाही, असा तगादा लावला होता. जावेद खान याने दिलेल्या कर्जापोटी व्याज म्हणून चार लाख ५० हजार रुपये दिले होते. संतोष पवार यालाही बहुतांश रक्कम परत दिली होती. तरीही व्याजाचे पैसे देण्यासाठी हे चौघे दमदाटी करीत होते.

मुलाला दिली सुसाइड नोटवैभव यांनी १४ वर्षीय मुलाला मुंबईतील नातेवाइकांकडे पाठविले होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुलाच्या मोबाइलवर सुसाइड नोट पाठविली. मुलाने रात्री पाहिल्यावर वडिलांना फोन केला. मात्र त्यांनी उचलला नाही. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांना फोन केला. पोलिसांना पाचारण केल्यावर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. वैभव यांना त्वरित रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले.

टॅग्स :Puneपुणे