औषधासाठी पत्नीने मागितले पैसे, मिळाल्या लाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:13 IST2021-09-08T04:13:47+5:302021-09-08T04:13:47+5:30

पुणे : दोघांचाही अनेक वर्षांचा संसार, त्यात त्यांच्या नेहमीच कुरबुरी सुरू असायच्या. आता दोघेही तसे ज्येष्ठ झालेले वयाेमानानुसार यांना ...

Money demanded by wife for medicine, kicked | औषधासाठी पत्नीने मागितले पैसे, मिळाल्या लाथा

औषधासाठी पत्नीने मागितले पैसे, मिळाल्या लाथा

पुणे : दोघांचाही अनेक वर्षांचा संसार, त्यात त्यांच्या नेहमीच कुरबुरी सुरू असायच्या. आता दोघेही तसे ज्येष्ठ झालेले वयाेमानानुसार यांना आजाराने घेरलेले. त्यामुळे ५५ वर्षांच्या पत्नीने आपल्या ६० वर्षांच्या पतीकडे औषध व दवाखान्यासाठी पैसे मागितले. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. भरचौकात सुरू असलेला हा वाद हातघाईवर आला. तेव्हा पतीने पत्नीवर हात उगारला. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्या पडून जखमी झाल्या. पतीने मारहाण केल्याची फिर्याद तिने वारजे पोलिसांकडे केली. त्यानुसार, पोलिसांनी ६० वर्षांच्या पतीविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

वारजे माळवाडी येथील शिवशक्ती चौकाजवळील चव्हाण बिल्डिंगसमोर रविवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला.

दोघेही पति-पत्नी असले, तरी आता इतक्या वर्षांच्या संसारानंतर तिने आपल्याच पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे. वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पतीला नोटीस बजावण्यासाठी संपर्क केला. तेव्हा तेही तापाने आजारी असल्याचे समजले. वारजे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Money demanded by wife for medicine, kicked