शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

बोटांच्या ठशांच्या आधारे काढता येणार पैसे

By admin | Updated: April 16, 2017 04:11 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने केवळ हाताच्या बोटांच्या ठशांचा आधार घेऊन सर्व आर्थिक व्यवहार करणारे ‘मायक्रो एटीएम’ मशीन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने केवळ हाताच्या बोटांच्या ठशांचा आधार घेऊन सर्व आर्थिक व्यवहार करणारे ‘मायक्रो एटीएम’ मशीन शोधून काढले आहे. त्यासाठी नागरिकांचा आधारकार्डचा डेटा बँक खात्याशी जोडावा लागेल. परिणामी, क्रेडिट कार्ड किंवा डेबोट कार्डऐवजी आता सर्व व्यवहार बायोमेट्रिकच्या आधारे करता येतील. विद्यापीठात स्थान केल्या जाणाऱ्या ‘सेंटर फॉर इंटेलिजंट सिस्टीम’च्या माध्यमातून ही यंत्रणा तयार केली जाणार आहे.विद्यापीठात ‘सेंटर फॉर इंटेलिजंट सिस्टीम’ स्थापन केली जाणार असून, येत्या सोमवारी (दि. १७) केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन आॅनलाईन पद्धतीने होईल. केंद्राच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियन (रुसा) योजनेअंतर्गत विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागामार्फत इंटेलिजंट सिस्टीम सेंटर चालविले जाणार आहे. सध्या नागरिकांना डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या साह्याने आर्थिक व्यवहार करावे लागतात. मात्र, विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने शोधलेल्या तंत्रज्ञानामुळे बायोमेट्रिकच्या साह्याने आर्थिक व्यवहार करणारे करता येतील. आधार कार्डसाठी बोटांचे ठसे, डोळ्यांचे छायाचित्र (आय स्कॅन ) घेण्यात आले आहेत. आधार कार्ड बँक खात्याशी जोडून बोटांच्या ठशाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करता येतील. याबाबत तंत्रज्ञान विभागाकडून संशोधन सुरू होते त्याला यश आले आहे. तसेच त्याचे पेटंटही मिळाले आहे. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहार बिनचूक व्हावेत, यासाठी आवश्यक असेलल्या सुरक्षिततेच्या सर्व तांत्रिक पातळ्याही पूर्ण केल्या आहेत.तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने केलेल्या संशोधनामुळे बायोमेट्रिकच्या साह्याने आर्थिक व्यवहार करणे सहज शक्य होईल. आधार कार्डचा डेटा बँक खात्यांशी जोडला गेल्यास मायक्रो एटीएमवरून बोटांच्या ठशाच्या साह्याने पैसे देता किंवा घेता येतील. विभागाने आवश्यक संशोधन केले असून, आता केवळ अत्याधुनिक मशीन तयार करण्याचे काम बाकी आहे. त्यासाठी विद्यापीठाने पर्सिस्टंट कंपनीला बरोबर घेतले असून, त्या संदर्भातील काही बँकांबरोबर बोलणी सुरू केली आहेत. त्यामुळे पुढील काळात एटीएम कार्ड वापरण्याची आवश्यकता भासणार नाही. हॉटेलमध्ये बील देण्यासाठी मायक्रो एटीएम मशीनवर केवळ बोटांचे ठसे दिल्याने संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून हॉटेल चालक स्वत:च्या बँक खात्यात पैसे जमा करून घेवू शकेल. हे मायक्रो एटीएम मशीन स्वाईप मशीनच्या आकाराचे असेल. बँकांमध्येही आर्थिक व्यवहारासाठी या मशिनचा वापर करता येईल.त्यामुळे डिजिटल बँकिंग व्यवहाराला अधिक चालना मिळेल. - डॉ. अदित्य अभ्यंकर, प्रमुख, तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ