शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सोमवार ठरला अपघातवार! पुणे जिल्ह्यात विविध अपघातांत ६ जणांचा मृत्यू : २ लहानग्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 02:59 IST

पुणे जिल्ह्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीचाच दिवस सोमवार हा दुर्दैवाने घातवार ठरला. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी घडलेल्या अपघातांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. त्यातही गंभीर व दुर्दैवी बाब म्हणजे यात चार लहान मुलांचा समावेश आहे.

पुणे : जिल्ह्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीचाच दिवस सोमवार हा दुर्दैवाने घातवार ठरला. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी घडलेल्याअपघातांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. त्यातही गंभीर व दुर्दैवी बाब म्हणजे यात चार लहान मुलांचा समावेश आहे. पुरंदर तालुक्यात दोन ठिकाणी मोठे अपघात झाले, तर पुणे-पंढरपूर मार्गावर झालेल्या एका अपघातात तिघांचा मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यात एका विधवा महिलेने पतीच्या निधनानंतर आलेल्या अस्वस्थतेमुळे आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या करून जीवन संपविले.खड्डा चुकविताना दोन लहानग्यांचा मृत्यू खळद : रस्त्यावरील खड्डा चुकविताना टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन लहान सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर आई-वडील गंभीर जखमी झाले.मिळालेल्या माहीतीनुसार सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर खळद गावच्या हद्दीत रासकरमळा वस्तीजवळ अरूंद पुलावर हा अपघात घडला. आयशर टेम्पो (क्र. एम. एच. १२ एफ. सी. ८१४४) हा सासवडहून जेजुरीच्या दिशेने जात असताना जेजुरीहुन सासवडकडे जाणारी हिरो होंडा स्प्लेंडर (एम. एच. २३, ए. ए. ३८६५) यांच्यात धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की या धडकेत काजल प्रकाश जाधव (वय ३ वर्ष), अर्चना प्रकाश जाधव (वय २ वर्ष) या बहिणींचा मृत्यू झाला तर त्यांची आई लक्ष्मी प्रकाश जाधव (वय २३ वर्ष), वडील प्रकाश लक्ष्मण जाधव (वय २६ वर्ष), भाऊ रोहन प्रकाश जाधव (वय ५ वर्ष), बहीण वैशाली प्रकाश जाधव (वय ७ वर्ष), (सर्व रा. राजेटाकळी, ता. घनसांगी, जि.जालना सध्या. रा. निमगाव पाटी, अकलुज, सोलापूर) हे या अपघातात गंभीररित्या जखमी झाले.याबाबत राष्टÑीय महामार्गाच्या अधिका-यांशी चर्चाकेली असता त्यांनी एक वर्षापुर्वीया रस्त्यावर राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण यांच्या माध्यमातुन काही कोटी रूपयेखर्च करून दुरूस्ती करण्यात आली होती ती अजुन बाकी असताना व रस्त्याचेकाम अर्धवट असताना आम्हाला यावर काम करता येत नसल्याचेस्पष्ट केले, तर जेथे आमच्या नियमानुसार काम पुर्णझालेआहेत्या भागात आम्ही दुरूस्तीला सुरूवात केली आहे तर ज्या भागात रस्त्याचेकाम अर्धवट आहेतेथे मात्र रस्ता जरी आमच्याक डेवर्ग झाला असला तरी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागानेच दुरूस्ती करावी .- श्रुती नाईक,उपअभियंता राष्ट्रीय महामार्गपालखी महामार्गावर मोठमोठे खडडे् पडले असुन गेली काही दिवसयाची दुरूस्ती झाली नसल्याने रोज या मार्गावर लहान मोठे अपघात होत असुन या मार्गाची दुरूस्ती सध्या राज्य मार्ग व राष्टÑीय महामार्ग यांच्या हस्तांतराच्या वादात अडकली आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा केली असता ते म्हणाले, की आमच्या वादात या रस्त्याची दुरूस्ती रखडणार नाही. आज सोमवारी रात्रीच सासवड जेजुरी रस्त्याच्या खड्ड्याची माहीती घेऊन मंगळवारीच याची तातडीने दुरूस्ती केली जाईल. त्यात दिरंगाई होणार नाही याची काळजी घेऊ.- धनंजय देशपांडे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण पुणे.इंदापूर-अकलूज रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार ठारइंदापूर : इंदापूर - अकलूज रस्त्यावर वडापुरीजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर त्याचा जोडीदार जखमी झाला आहे. आज दुपारी एक वाजता ही घटना घडली.या अपघातात संतराज छेदी शर्मा (वय २३, रा. मुळ उत्तर प्रदेश, सध्या टेंभूर्णी नाका, इंदापूर) याचा मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी अतुल श्रीअद्याराम गौड (रा. मुळ उत्तर प्रदेश, सध्या टेंभूर्णी नाका, इंदापूर) हा जखमी झाला आहे. ते दुचाकी गाडी क्रमांक एमएच ४२/सी १०४९ वरून इंदापूरकडे येत होते. वडापुरी नजिक टिलर क्रमांक आरजे १४/जी ३००० ची ठोक बसल्याने संतराज जागीच मयत झाला. तर अतुल गौड जखमी झाला आहे. या प्रकरणी ओमप्रकाश श्रीरंगलाल विना या टिलर चालकास ताब्यात घेतले आहे. तो मूळचा राजस्थानचा आहे.पुणे-पंढरपूर महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यूनीरा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास नीरा (ता. पुरंदर) नजीक एका टायरच्या दुकानासमोर वाहनाला ओव्हरटेक करताना दहाचाकी ट्रेलर (मोठा ट्रक) व दुचाकी यांच्यात मोठा अपघात झाला. दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिसुर्टी (ता. पुरंदर) येथील गोपीनाथ जगन्नाथ बरकडे (वय ३२) व त्यांच्या पत्नी नीलम व मुले ओम, पार्थ व मुलगी जननी यांना दुचाकीवर घेऊन नीरेकडे आधार कार्ड लिंक करण्यासाठी चालले होते. या वेळी पुढे जाण्यासाठी चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करताना नीरेकडून जेजुरीच्या दिशेने निघालेल्या समोरून येणाºया दहाचाकी ट्रेलरचा अंदाज न आल्याने दुचाकी व ट्रेलर यांच्यात अपघात झाला.या अपघातात गोपीनाथ यांच्या पत्नी नीलम (वय २८), मुले ओम (वय साडेतीन वर्षे), पार्थ (वय दीड वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला, तर गोपीनाथ (वय ३२) व मुलगी जननी (वय ४) गंभीर जखमी झाले आहेत. मृतांना शवविच्छेदनासाठी जेजुरी येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील शवागृहात हलविण्यात आले असून, गोपीनाथ यांच्यावर लोणंद (ता. खंडाळा) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून, मुलगी जननीला नीरेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, घटनेची माहिती कळताच नीरा पोलीस दूरक्षेत्राचे सुदर्शन होळकर, देवेंद्र खाडे, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, रामचंद्र कर्नवर व पोलीस मित्रांनी घटनास्थळी भेट दिली.पेट्रोलिंग करणारे कर्मचारीही वेळेत मदतीला धावल्याने जखमींना पुढील उपचारासाठी लवकर हलविणे शक्य झाल्याचे होळकर यांनी सांगितले. या घटनेची फिर्याद बरकडे यांचे चुलते सतीश अण्णा बरकडे यांनी नीरा पोलिसात दिली आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे