सोमवारी १२८ कोरोनाबाधित : १८५ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:14 IST2021-08-17T04:14:53+5:302021-08-17T04:14:53+5:30

पुणे : शहरात सोमवारी १२८ कोरोनाबाधित आढळून आले असून, १८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ...

Monday 128 coronated: 185 coronal free | सोमवारी १२८ कोरोनाबाधित : १८५ कोरोनामुक्त

सोमवारी १२८ कोरोनाबाधित : १८५ कोरोनामुक्त

पुणे : शहरात सोमवारी १२८ कोरोनाबाधित आढळून आले असून, १८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार २७२ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २़ ०४ टक्के इतकी आढळून आली आहे.

दरम्यान, आज दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही २ हजार ३५ असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ८० टक्के इतका आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २०३ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २८५ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३० लाख ११ हजार ११ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९० हजार ५७४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७९ हजार ६८६ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

--------

Web Title: Monday 128 coronated: 185 coronal free