फनटाईम येथील उड्डाणपुलाच्या कामाला मिळेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:10 IST2021-05-16T04:10:05+5:302021-05-16T04:10:05+5:30

गजबजलेल्या सिंहगड रस्ताला वाहतूककोंडी नित्याचीच आहे. राजाराम पूल ते वडगाव पुलापर्यंत रोजच वाहतूककोंडीच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. येथील वडगांव ...

Moment of not getting work on the flyover at Funtime | फनटाईम येथील उड्डाणपुलाच्या कामाला मिळेना मुहूर्त

फनटाईम येथील उड्डाणपुलाच्या कामाला मिळेना मुहूर्त

गजबजलेल्या सिंहगड रस्ताला वाहतूककोंडी नित्याचीच आहे. राजाराम पूल ते वडगाव पुलापर्यंत रोजच वाहतूककोंडीच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. येथील वडगांव ते पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंत पर्यायी रस्ता झाला असला तरीही काही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने नागरिक मुख्य रस्त्याचा वापर अधिक प्रमाणात करीत आहेत.

म्हणून राजाराम पूल ते फनटाईम सिनेमागृहपर्यंत उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. निविदेची पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण करून लवकरच पूल उभारण्यास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

कोट:

पहिल्या दोन निविदा जादा दराने आल्या होत्या. कररूपी पैशांची उधळपट्टी होऊ नये, म्हणून फेरनिविदा काढण्यात आल्या आहेत. कामात कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून प्रक्रिया जलद करण्याचा प्रयत्न आहे.

- मंजूषा नागपुरे, स्थानिक नगरसेविका

Web Title: Moment of not getting work on the flyover at Funtime