विद्यार्थिनीचा विनयभंग
By Admin | Updated: February 24, 2015 00:25 IST2015-02-24T00:25:12+5:302015-02-24T00:25:12+5:30
आळे (ता. जुन्नर) येथील परीक्षा केंद्राबाहेर १२ वीचा पेपर सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीला लज्जास्पद बोलत विनयभंग करणाऱ्या युवकाविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

विद्यार्थिनीचा विनयभंग
आळेफाटा : आळे (ता. जुन्नर) येथील परीक्षा केंद्राबाहेर १२ वीचा पेपर सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीला लज्जास्पद बोलत विनयभंग करणाऱ्या युवकाविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
केंद्राबाहेरच आणे येथील संग्राम अशोक आहेर हा तरुण दुचाकीवरून तेथे आला होता. यातील एका विद्यार्थिनीचा हात
पकडत लज्जास्पद बोलत तिचा विनयभंग केला.याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)