शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, मुलासह आईवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 10:50 IST

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या तरुणीचा गर्भपात घडवून आणणाऱ्या मुलासह त्याच्या आईवर चंदननगर पोलिस ...

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या तरुणीचा गर्भपात घडवून आणणाऱ्या मुलासह त्याच्या आईवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल विजय आकरे आणि दीपाली विजय आकरे (दोघेही रा. माळवाडी, हडपसर), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२४ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे ओळखीचे आहेत. याच ओळखीतून विशालने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. त्यानंतर विशालने तरुणीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. या प्रकारामुळे ती गर्भवती राहिली. त्यानंतर विशाल आणि त्याच्या घरच्यांनी तिला, तुमची व आमची बरोबरी होऊ शकत नाही, तू जर पोलिसांत तक्रार केली तर तुझे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी दिली, तसेच तिच्या पोटातील बाळ खाली करण्यास भाग पाडत तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यासाठी दिल्या. याचदरम्यान आरोपींनी तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड