शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरती संस्थाचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 12:08 IST

विनयभंग, पोक्सोसह गुन्हा दाखल. राजगुरुनगर शहरातील घटना.

राजगुरुनगर: पोलीस ॲकॅडमीत संस्थाचालकाकडून सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. वामन सुरेश गव्हाणे (वय ३७ गव्हाणे करियर ॲकॅडमीत संस्थापक, रा. ब्राम्हणअळी, राजगुरूनगर, ता खेड ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन खेड पोलिसांत विनयभंग, पोक्सो  कायद्यासह इतर कलमानुसार गव्हाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पीडित मुलगी मुळची सोलापुर जिल्ह्यातील असून ती ३ मे २०२४ पासून गव्हाणे करियर ॲकॅडमीत  भरतीपूर्व प्रशिक्षणाकरीता दाखल झालेली होती. बुधवारी (दि ११) संध्याकाळी इतर प्रशिक्षित मुलींबरोबर असताना पीडित मुलीला तिच्या आईचा फोन आला आहे. असे सांगून चालक गव्हाणे याने कार्यालयात बोलावून घेतले. ती आत आल्यावर फी जमा झाली नसल्याचे कारण सांगून स्वतःचा मोबाईल पाहायला सांगितले. मुलीने मोबाईल हातात घेऊन पाहायला सुरू करताच कार्यालयाचे दार आतून बंद करून गव्हाणे याने मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याच वेळी एक प्रशिक्षणार्थी मुलगा कार्यालयाकडे त्याच्या कामासाठी धावत आला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला असा घटनाक्रम तक्रारीत नमूद केला आहे.

राजगुरुनगर शहरात तालुका क्रीडा संकुल येथे या ॲकॅडमीचे कार्यालय आहे. आरोपी गव्हाणे याच्या ॲकॅडमीमध्ये सुमारे १०० विद्यार्थी विद्यार्थिनी भरतीपूर्व शिक्षण घेत असून पीडित मुलीप्रमाणे आणखी काही विद्यार्थीनींसोबत अशा प्रकारचे कृत्य झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे याबाबत आरोपीकडे सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे खेड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल गुरव यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे