अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: December 23, 2016 00:28 IST2016-12-23T00:28:15+5:302016-12-23T00:28:15+5:30
गेल्या सहा महिन्यांपासून ते मंगळवार, दि. २० रोजीपर्यंत रोज दुपारी बाराच्या दरम्यान अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
कामशेत : गेल्या सहा महिन्यांपासून ते मंगळवार, दि. २० रोजीपर्यंत रोज दुपारी बाराच्या दरम्यान अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शरद ऊर्फ सोमनाथ गजानन पवार (वय २४, रा. करुंज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामशेत पोलिसांनी आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, गुरुवारी (दि. २२) आरोपीला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजार करण्यात आले असून, पुढील तपास सहायक निरीक्षक रावसाहेब खेडेकर करीत आहेत. (वार्ताहर)