विनयभंगप्रकरणी सक्तमजुरी
By Admin | Updated: November 15, 2016 03:51 IST2016-11-15T03:51:36+5:302016-11-15T03:51:36+5:30
पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्त तपासण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी एकाला ३ वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

विनयभंगप्रकरणी सक्तमजुरी
पुणे : पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्त तपासण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी एकाला ३ वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
नितीन दिगंबर पाटील (वय २४, रा. विमाननगर) असे त्याचे नाव आहे. ही घटना विमाननगर येथील एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये ८ जुलै २०१४ रोजी घडली. याबाबत या मुलीच्या आईने विमानतळ पोलिसात फिर्याद दिली आहे. पीडित मुलीला त्या रक्ततपासणीसाठी पॅथॉलॉजी लॅबमध्ये घेऊन गेल्या होत्या. त्या वेळी नितीनने तपासणीसाठी मुलीच्या हातातून रक्त काढून घेतले. त्यानंतर त्या ठिकाणाहून रक्त येण्याचे बंद झाले नाही त्यामुळे त्या ठिकाणी टेप लावण्यासाठी म्हणून नितीन त्या मुलीला पोटमाळ्यावर घेऊन गेला. तिथे तिचा विनयभंग केला़
या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी ३ साक्षीदार तपासले. त्यात संबंधित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने नितीन पाटीलला दोषी ठरवत ३ वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. (प्रतिनिधी)