चित्रकलेच्या शिक्षकाविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा
By Admin | Updated: January 26, 2015 01:45 IST2015-01-26T01:45:40+5:302015-01-26T01:45:40+5:30
सोलंकी हा येरवड्यातील एका प्रख्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये चित्रकला शिकवतो.

चित्रकलेच्या शिक्षकाविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा
पुणे : चित्रकलेचे प्रशिक्षण देत असताना पहिलीतील विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या येरवड्यातील एका इंग्रजी शाळेच्या शिक्षकाविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
प्रदीप शेषरावसिंह सोलंकी (वय ३२, रा. अमित कॉम्प्लेक्स, चिंचवड गाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. सोलंकी हा येरवड्यातील एका प्रख्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये चित्रकला शिकवतो. त्याच्याकडे चित्रकला विषय शिकण्यासाठी येत असलेल्या पहिलीतील चार विद्यार्थिनींसोबत त्याने अश्लील वर्तन केले होते. मुलींनी हा प्रकार शाळेतील शिक्षक आणि पालकांना सांगितल्यानंतर उघडकीस आला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्याला अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
मुलींचा महिला सहायक निरीक्षक ढाकणे यांनी त्यांच्या आई व मुख्याध्यापिकेसमोर जबाब नोंदवला असून, चौकशी केली. अटक आरोपीने आणखीही मुलींसोबत अशा प्रकारचे वर्तन केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)