शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कसबा पेठेत दहशत पसरवून लुटमार करणाऱ्या थोरात टोळीवर ‘मोक्का’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 09:20 IST

कसबा पेठेतील पवळे चौकात मेट्रो स्टेशनचे काम करणारे चहा पिऊन परत कामावर जात असताना अंकुश थोरात व कांबळे यांनी त्यांच्याशी भांडणे केली...

पुणे : कसबा पेठेत दहशत पसरवून लुटमार करणाऱ्या अंकुश थोरात व त्याच्या साथीदारावर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी मोक्का कारवाई केली. अंकुश सूर्यकांत थोरात (वय २९, रा. ताडीवाला रोड, मूळ छत्रपती संभाजीनगर) आणि मिथुन शिवदास कांबळे (वय ३०, रा. ताडीवाला रोड) अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

कसबा पेठेतील पवळे चौकात मेट्रो स्टेशनचे काम करणारे चहा पिऊन परत कामावर जात असताना अंकुश थोरात व कांबळे यांनी त्यांच्याशी भांडणे केली. त्यांना रिक्षात डांबून ठेवले. चाकूचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन मोबाइल फोन व फोन पेद्वारे पैसे ट्रान्सफर करून घेतले होते.

अंकुश थोरात याने प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळ्या साथीदारासह गुन्हे केले आहेत. पुणे शहर, पिंपरी व छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हेगारी कारवाया करून दहशत निर्माण केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार प्रस्ताव तयार करून पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे पाठविला. पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत ८७ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

टॅग्स :MCOCA ACTमकोका कायदाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे