शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

साडेचार कोटींचा दरोडा टाकणाऱ्या परप्रांतीय टोळीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 17:39 IST

आरोपीने महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात देखील दरोडे टाकले आहेत.

ठळक मुद्देगुन्हयातील ३,८९,३४,७९२ रुपयांचा माल ,दोन ट्रक आरोपींकडून जप्त

बारामती : वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोरगाव नीरा रोडवर २४ जुन रोजी सिगारेट घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दरोडा टाकुन ४.५० कोटी रुपयांचा कंटेनर लुटणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीविरूध्द मोका अतंर्गत कारवाई केली आहे. आरोपीने महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात देखील दरोडे टाकले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली. 

सविस्तर घटना अशी की, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मोरगाव - निरा रोडवरून दि २४ जून २०२० रोजी आयशर ट्रक नं ( एन एल ०१ एल ४३३९ ) ट्रकमध्ये रांजणगाव येथून निघालेल्या आयटीसी कंपनीची फिल्टर सिगारेट बॉक्स ४,६१,८८,८२० रुपयांचा माल घेऊन ट्रक कर्नाटक हुबळी याठिकाणी घेवुन जात असताना दुपारी २.०० वा. सुमा मोरगाव (ता बारामती) गावाच्या हद्दीत मोरगाव -निरा रोडवर १३ अज्ञात व्यक्तींनी ट्रकवर दरोडा टाकला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंड यांच्या पथकाने वडगाव निंबाळकर पोलिसांनी या दरोडा प्रकरणातील गुन्हयातील कल्याणसिंग सदुलसिंग चौहान ( वय ४४ रा ओढ ता सोनकच जि देवास) ओमप्रकाश कृष्णा झाला (वय ३८ रा. भैरवखेडी ता.टोकखुर्द जि. देवास ) दिनेश वासुदेव झाला (वय ५० रा. टोककला ता. टोंकखुर्द जि. देवास ) सुशिल राजेंद्र झाला (वय ३७ रा. टोककला ता. टोंकखुर्द जि. देवास ) मनोज उर्फ गंगाराम राजाराम सिसोदिया ( वय ४२ रा भैरवखेडी ता टोकखुर्द जि देवास ) सतिश अंतरसिह झांझा ( वय ४० रा. ओढ ता. सोनकच जि. देवास ) मनोज केसरसिंग गुडेन ( वय ४० रा. ओढ ता. सोनकच जि. देवास ) या आरोपींना अटक केली. गुन्हयातील ३,८९,३४,७९२( तीन कोटी एकोण नव्वद लाख, चौतीस हजार सातशे ब्यान्नव) रुपयांचा माल ,दोन ट्रक आरोपींकडून जप्त करण्यात आला. आरोपींवर आधी महाराष्ट्र राज्यातील यवत, शिक्रापूर ,शनि शिंगणापुर पोलीस स्टेशच्या हद्दीत तसेच कर्नाटक, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल , ओरिसा, हरियाणा राज्यात आरोपींवर औषध ,सिगारेट च्या ट्रकवर दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.आरोपींनी अनेक राज्यात दरोड्याचे गुन्हे केल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी करण्यात आली आहे. तत्कालीन पोलीस अधिक्षक, संदीप पाटील अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, गणेश कवितके,विठठल कदम, भाउसाहेब मारकड, अमोल भुजबळ हे या तपास कामात सहभागी होते.प्रभारी पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते यांनी सर्व टीमला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.  

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस