शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना खंडणी मागणाऱ्या १३ जणांना मोक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 16:49 IST

राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर बदनामीकारक माहिती सोशल मीडियावरुन व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे फिर्यादीच्या मध्यस्थीने पहिल्यांदा ५० कोटी रुपयांची खंडणी मागणी, तडजोडीअंती ३० कोटी रुपये

बारामती  :राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांची बदनामीकारक माहिती सोशल मीडियावरुन व्हायरल करण्याची धमकी देवुन  यांच्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी  शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परीषदेत याबाबत माहिती दिली.अधिक माहिती देताना शिरगांवकर यांनी सांगितले की, प्रकरणात सचिन ज्ञानेश्वर पडळकर (वय ३०, रा. पिलिव, पडळकरवस्ती, ता. माळशिरस, जि.सोलापूर), डॉ. इंद्रकुमार देवराज भिसे (वय ४२, रा. पेरीयार भवन, खरामळा, ता. शिरुर, जि. पुणे), दत्तात्रय पांडूरंग करे (वय ३४, रा. करेवस्ती, सदाशिवनगर, ता. माळशिरस), विकास शिवाजी अलदर (वय ३४, रा. आडेगाव, ता माढा ), तात्यासाहेब लक्ष्मण कारंडे (वय २६, रा. माळेगाव, ता. माढा) ,बिरुदेव लक्ष्मण कारंडे (वय २३, रा. माळेगाव, ता. माढा ), सुशांत दादासाहेब करे (वय १९, रा. नरवणे, ता. माण, जि. सातारा), दिपक विठ्ठल जाधव (वय २, रा. वडजल, ता. माण), नितीन राजेंद्र पिसे (वय २३, रा.म्हसवड, ता. माण) यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या ९ जणांसह जगन्नाथ जानकर ( रा. पळसावडे, ता. माण),  विनायक मासाळ व राजू अर्जून आणि रमेश कातुरे (रा. आटपाडी, जि. सांगली) यांचा समावेश आहे. या चार आरोपींची पूर्ण नावे पोलिसांकडे नाहीत. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या आरोपींचा शोध सुरु आहे.संबंधित आरोपींकडे तपास सुरु असताना त्यांच्यावर या आधीदेखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्ह्याचा तपास सुरु असताना आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता.यामध्ये तीन चारचाकी वाहने, ४ लाख ९२ हजार रोख रक्कम पोलिसांना मिळाली होती. ९ मे रोजी आरोपींना खंडणीची रक्कम स्वीकारताना बारामतीत अटक करण्यात आली होती. याप्रकरणी अण्णासाहेब बळवंत रुपनवर (वय ५४, रा. कुरबावी, ता. माळशिरस) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

आरोपींनी ४ मे रोजी बारामतीतील कृष्णसागर हॉटेलमध्ये तर ६ मे रोजी स्वारगेट येथील नटराज हॉटेलात फिर्यादीला बोलावून ना. जानकर व दोडतले यांची बदनामीकारक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करू, दोडतले यांना मारहाण करून त्यांचे हातपाय तोडू अशी भीती दाखवून फिर्यादी रुपनवर यांना त्याप्रकरणात अडकविण्याची भीती दाखवली होती.त्यापोटी फिर्यादीच्या मध्यस्थीने पहिल्यांदा ५० कोटी रुपयांची खंडणी मागणी करुन तडजोडीअंती ३० कोटी रुपये देण्याचे ठरले. त्यातील १५ कोटींचा पहिला हप्ता बारामती येथे देण्यास सांगितले होते.त्यानुसार बारामतीत आरोपींना पकडण्यात आले.

या टोळीतील पडळकर विरोधात चार गुन्हे, खंडणी,डॉ. भिसे विरोधात खंडणी, कट रचून खूनाचा प्रयत्न आदी ३ गुन्हे, करे विरोधात खंडणी आणि सरकारी कामात अडथळा  दोन, तर अलदर विरोधात चोरीचा आणि खंडणीचा, जगन्नाथ जानकर व राजू अर्जून यांच्यावर मारामारी, बेकायदा गर्दी, जमाव जमवणे, व अन्य गुन्हे दाखल असल्याचे शिरगांवकर यांनीसांगितले.पोलिस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर अधिक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ नुसार मंजूरीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आल्याचे शिरगांवकर यांनी सांगितले.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीMahadev Jankarमहादेव जानकरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस