शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मोकार फिरणाऱ्यांची रस्त्यावर चाचणी २२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST

--- इंदापूर : कोरोनाने इंदापूर शहर व तालुक्यात कहर केला असताना आणि संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी शासनाने लोकांना विनंती ...

---

इंदापूर : कोरोनाने इंदापूर शहर व तालुक्यात कहर केला असताना आणि संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी शासनाने लोकांना विनंती व दंडात्मक कारवाईची बडगा दाखविला असतानाही बिनाकामाचे मोकार बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झालीच नाही. त्यामुळे इंदापूर पोलिसांनी आज आरोग्य विभागाच्या मदतीने इंदापूर शहरात फिरणाऱ्या १६५ नागरिकांची रस्त्यावरच ॲन्टीजन तपासणी केली. त्यावेळी तब्बल २२ नागरिक कोरोना बाधित आढळल्याने शहरात खळबळ उडाली. हे बावीस नागरिक ज्या ज्या ठिकाणी फिरले असते ज्यांच्या संपर्कात आले असते तितक्या नागरिकांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला असता मात्र पोलिसांच्या या नव्या उपायामुळे काही प्रमाणात का होईना हा फैलाव कमी होण्यास मदत झाली.

याबाबत माहिती देताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे आणि पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी माहिती दिली की, इंदापूर शहरातील बाबा चौक येथे सकाळी आठच्या सुमारासच इंदापूर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची रस्त्यावरच रॅपिड अँटीजन स्स्ट करण्यात आली. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यांना रुग्णवाहिकेतून थेट कोविड केअर सेंटरला दाखल करण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, तहसिलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा उपस्थित होते. ही चाचणी कोविड टेस्ट एक्स्पर्ट अजीम तांबोळी, अमोल पाटोळे, वैभव वाघमारे यांनी नागरिकांची कोविड तपासणी केली.

ही कारवाई तहसीलदार अनिल ठोंबरे, सहायक पोलीस निरीक्षक धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार तांबे, पोलीस हवालदार अमोल खैरे, पोलीस हवालदार शंकर वाघमारे, अमोल गारुडी, विनोद पवार, दीपक पालके, विक्रम जमादार, महिला पोलीस कॉन्स्टेबल शुभांगी खंडागळे, माधुरी लडकत यांनी केली.

--

चौकट :

पोलीस जवानांना उन्हाळी टोप्यांचे वाटप

इंदापूर शहरात सकाळपासून दिवसभर इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान व अधिकारी तहान भूक हरपून रस्त्यांवर नागरिकांसाठी तैनात होते. दुपारी उन्हाचा चटका वाढला होता तरीही उन्हात उभे राहून नागरिकांची सेवा करीत होते. त्यामुळे नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी इंदापूर नगरपरिषदेचे कर्मचारी गजानन पुंडे यांना सांगून सर्व पोलिसांना उन्हापासून वाचण्यासाठी पांढऱ्या टोप्या दिल्या. त्यामुळे स्वत:ची काळजी घेत पोलिसांनी त्यांच्या गणवेशाच्या टोप्यांऐवजी पांढरी टोपी घालून कर्तव्य बजावले.

--

चौकट

मागील पंधरा महिन्यातील रेकॉर्डब्रेक रुग्ण संख्या

शुक्रवारी

इंदापूर तालुक्यात शुक्रवार ( दि. २३ ) रोजी इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात २५४, तर शहरी भागात ४६ असे एकूण ३०० कोरोनाबाधित रुग्ण एकाच दिवसात आढळून आले आहेत. मागील सव्वा वर्षात पाहिल्यांदाच कोरोनाच्या रुग्णांची रेकॉर्डब्रेक रुग्ण संख्या आढळून आल्याने, सर्वच विभागाचे प्रशासन शनिवारी प्रचंड ऍक्टिव्ह मोडवर आले होते. तर १५७ रुग्ण बरे करून घरी सोडण्यात आले, तर ६ कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे.

--

फोटो क्रमांक : २४इंदापूर टेस्ट

फोटो ओळी: इंदापूर शहरातील बाबा चौकात पकडलेल्या नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्ट करताना पोलिस व आरोग्य कर्मचारी.

--