शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील गुन्हेगारीवरून मोहोळ-पवार आमनेसामने;

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 09:34 IST

या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, गुन्हेगारी हा मुद्दाच प्रचारात ऐरणीवर राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होताच शहरातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. गुन्हेगारीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार वाकयुद्ध पेटले असून, दोघेही एकमेकांवर थेट आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. 

राजकीय वातावरण तापले -या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, गुन्हेगारी हा मुद्दाच प्रचारात ऐरणीवर राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोयता गॅंग संपली पाहिजे, सांगणाऱ्यांची उमेदवार यादी बघा म्हणजे कळेल...भाजपने पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या मीडिया सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्यावर थेट टीका केली. ते म्हणाले, 'कोयता गँग संपली पाहिजे, पुण्यातील गुन्हेगारी संपली पाहिजे, असे पालकमंत्री सांगतात. मात्र, त्यांच्या उमेदवारांची यादी पाहिली तर टोकापासून टोकापर्यंत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे कोणत्या तत्त्वात बसते, हेच कळत नाही. अशा उमेदवारांमुळे पुण्यातील गुन्हेगारी वाढणार असून पुणेकर त्यांना मतदानातून चोख उत्तर देतील.'

तो गुन्हेगार परदेशात कसा काय पळाला? कोणाच्या शिफारशीने पासपोर्ट मिळाला?अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे बोलताना थेट पलटवार केला. ते म्हणाले, 'पुण्यातून एक गुन्हेगार व्यक्ती थेट परदेशात पळून गेली आहे. त्याला पासपोर्ट कोणी दिला? कसा दिला? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. गुन्ह्याच्या आरोपाखाली असलेली व्यक्ती परदेशात कशी काय जाते? पासपोर्ट देताना काय तपासणी झाली, कोणाच्या शिफारशीने तो मिळाला, हे स्पष्ट व्हायला हवे. फक्त आरोप झाले म्हणजे कोणी गुन्हेगार ठरत नाही. मात्र, अशा संवेदनशील प्रकरणांत पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. अन्यथा जनतेच्या मनात संशय निर्माण होतो. याची सविस्तर माहिती मी पत्रकार परिषदेत मांडणार असून, कोणाला वाचवण्यासाठी दबाव आहे का, याचाही खुलासा केला जाईल.'

English
हिंदी सारांश
Web Title : Mohol-Pawar Face Off Over Pune Crime Surge Amidst Election Season

Web Summary : As Pune's election nears, crime sparks a political battle. Mohol accuses Pawar's party of fielding criminals. Pawar questions how a criminal fled abroad and demands transparent investigation, promising further details at a press conference.
टॅग्स :PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारmurlidhar moholमुरलीधर मोहोळ