शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जनसंवाद मधील मोहोळ, धंगेकरांच्या खुर्च्या रिकाम्याच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 20:39 IST

गैरहजेरीवर टीका : वसंत मोरे, कर्नल सुरेश पाटील उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे: परिवर्तन संस्थेने आयोजित केलेल्या जनसंवाद या कार्यक्रमाला भाजपचे मुरलीधर मोहोळ व काँग्रेसचे रविंद्र धंगेकर अनुपस्थित राहिले. संयोजकांनी त्यांच्या खुर्च्या रिकाम्याच ठेवत वसंत मोरे व कर्नल सुरेश पाटील या दुसर्या दोन ऊमेदवारांबरोबर संवाद साधला.

मोहोळ धंगेकर यांना १५ दिवस आधी संपर्क साधून होकार घेतला. तरीही ते आले नाहीत. आताच असे उत्तरदायित्व दाखवणारे उमेदवार निवडून आलेच तर काय करतील असा प्रश्न करत परिवर्तनचे संयोजक तन्मय कानिटकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या खुर्च्या रिकाम्याच राहतील असे त्यांनी जाहीर केले व मोहोळ यांचे प्रतिनीधी म्हणून आलेले गणेश बिडकर यांना व्यासपीठावर बोलावण्यास नकार दिला.

परिवर्तनच्या अध्यक्ष अम्रुता नागटिळक, इंद्रनील सदलगे व कानिटकर यांनी मोरे व कर्नल पाटील यांना बोलते केले. आबासाहेब गरवारे कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. संस्थेने नागरिकांकडून प्रश्न मागवले होते. सार्वजनिक वाहतूक, बेरोजगारी, मेट्रोचा फायदा तोटा, लोकसंख्या, स्थलांतरीत, समान नागरी कायदा अशा अनेक विषयांवरचे प्रश्न होते.

मोरे व कर्नल.पाटील यांनी त्यांना उत्तरे दिली. सर्वाधिक प्रश्न सार्वजनिक वाहतूकीशी संबधित होते. नियोजनाचा अभाव व आहे ती व्यवस्था कार्यक्षम करण्यात अपयश असे यावर मोरे व पाटील यांनी सांगितले. खासदार झालो तर नियोजन करू व यात नक्की बदल करू, त्यासाठी काही उपाय आहेत, काही नियम आहेत, त्याचा अवलंब करण्यास भाग पाडू असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :pune-pcपुणेmurlidhar moholमुरलीधर मोहोळravindra dhangekarरविंद्र धंगेकरVasant Moreवसंत मोरे