मोहनसिंह राजपाल, परदेशींसह तिघांवर गुन्हा

By Admin | Updated: May 21, 2014 01:28 IST2014-05-21T01:28:51+5:302014-05-21T01:28:51+5:30

राजलक्ष्मी या अनिवासी भारतीय होत्या. १२ जुलै २०११ रोजी त्यांचे किडनीच्या विकाराने पुण्यात के.ई.एम. रुग्णालयात निधन झाले. त्यांचे निधन झालेले असताना वैद्यकीय साहाय्य योजनेचा अर्ज तयार करण्यात आला.

Mohansingh Rajpal, crime against three | मोहनसिंह राजपाल, परदेशींसह तिघांवर गुन्हा

मोहनसिंह राजपाल, परदेशींसह तिघांवर गुन्हा

पुणे : वैद्यकीय साहाय्य योजनेसाठी मृत महिलेच्या नावे बनावट कागदपत्रे करून महानगरपालिकेची १ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून या महिलेच्या भावावर, तसेच तत्कालीन महापौर आणि आरोग्य उपप्रमुख यांच्यावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. सी. एन. रविशंकर (१३२, रास्ता पेठ) असे या महिलेच्या भावाचे नाव आहे. मोहनसिंंग राजपाल आणि डॉ. सोमनाथ परदेशी अशी अन्य आरोपींची नावे आहेत. माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रवींद्र बोºहाटे (शनिवार पेठ) यांनी याबाबत फिर्याद केली आहे. राजलक्ष्मी बालसुब्रह्मण्यम असे मृत महिलेचे नाव आहे. राजलक्ष्मी या अनिवासी भारतीय होत्या. १२ जुलै २०११ रोजी त्यांचे किडनीच्या विकाराने पुण्यात के.ई.एम. रुग्णालयात निधन झाले. त्यांचे निधन झालेले असताना वैद्यकीय साहाय्य योजनेचा अर्ज तयार करण्यात आला. या अर्जावर राजलक्ष्मी यांचा केवळ फोटो लावण्यात आला. या अर्जावर राजपाल व परदेशी यांच्या तोंडी सूचनेतून तो मंजूर केल्याचा शेरा आहे. बºहाटे यांनी सांगितले की राजलक्ष्मी यांचे दोन पत्ते असलेली बनावट रेशनकार्डे तयार करण्यात आली आहेत. त्या झोपडपट्टीत राहत असल्याचे व त्यांच्याकडे पिवळ्या रंगाचे रेशनकार्ड असल्याचे तसेच वैद्यकीय उपचारांना मदत म्हणून एक लाख रुपये १३ जुलै रोजी मंजूर केल्याचे पत्र के.ई.एम. रुग्णालयास देण्यात आले आहे. राजलक्ष्मी यांच्या नावाने बनावट सभासद कार्ड डॉ. परदेशी यांच्या सहीशिक्क्याने तयार केले आहे. मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे करून दारिद्र्यरेषेखालील गरीब नागरिकांसाठी देण्यात येणार्‍या वैद्यकीय साहाय्याचा अपहार केला आहे, असा आरोप बºहाटे यांनी केला.

Web Title: Mohansingh Rajpal, crime against three