मोगरा रुसला
By Admin | Updated: May 26, 2014 05:14 IST2014-05-26T05:14:38+5:302014-05-26T05:14:38+5:30
उन्हाचा कडाका वाढत असल्याने फुलांवरही त्याचा परिणाम होत असून उत्पादन घटले आहे

मोगरा रुसला
पुणे : उन्हाचा कडाका वाढत असल्याने फुलांवरही त्याचा परिणाम होत असून उत्पादन घटले आहे. मात्र, त्यातही पॉलिहाऊसमधून उत्पादन घेणार्या शेतकरी आणि उत्पादकांच्या प्रयत्नांमुळे विविध प्रकारची फुले बाजारात उपलब्ध झाली आहेत. त्यामध्ये अन्य फुलांच्या तुलनेत मोगर्याला अधिक दर मिळत असल्याने बाजारात मोगरा ‘भाव’ खाऊ लागला आहे. माफक आवक आणि मागणीही स्थिर असल्याने फुलांच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत किंचित घट झाली. लग्नसराई जवळपास संपल्याने फुलांच्या मागणीवर परिणाम झाला आहे. रविवारी गुलटेकडीतील फुल बाजारात पुणे जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकर्यांकडून मोठी आवक झाली. यामध्ये जरबेरा, लिली, गुलाब, अबोली या फुलांचे प्रमाण सर्वाधिक होते. झेंडूचीही काही प्रमाणात आवक झाली. घाऊक फुलबाजारात गुलछडी, जर्बेरा, आॅस्टर व कार्नेशियन या फुलांच्या भावात घट झाली, तर इतर फुलांचे भाव स्थिर राहिले. असे असताना मोगर्याचे दर मात्र १०० ते ५०० रुपयांवर पोहोचले. पुढील आठवड्यात आवक झाली नाही तर, हे दर आणखी वाढतील, असे फुल व्यापार्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)