मोदींची आश्वासने खोटीच : कदम
By Admin | Updated: February 29, 2016 00:44 IST2016-02-29T00:44:38+5:302016-02-29T00:44:38+5:30
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक भारतीयांच्या बॅँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. ते अद्याप हवेच आहे.

मोदींची आश्वासने खोटीच : कदम
पिंपरी : लोकसभा निवडणुकीत प्रत्येक भारतीयांच्या बॅँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. ते अद्याप हवेच आहे. निव्वळ खोटी आश्वासने देऊन त्यांनी नागरिकांची फसवणूक केल्याची जोरदार टिका युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी केली.
खडकी कॅन्टोन्मेंटचे नगरसेवक मनीष आनंद यांच्या वॉर्डात मोफत वॉयफॉय इंटरनेट सुविधा, नागरी समस्या सोडविण्यासाठी मोबाईल अॅप व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कदम यांच्या हस्ते खडकी बाजार येथे झाले. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, रमेश बागवे, नगरसेवक कैलास गायकवाड, पुजा आनंद, वैशाली पहिलवान, शैलेजा खेडेकर, महिला शहराध्यक्षा मंदा चव्हाण, नदीम मुजावर, विकास लांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)