शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

वीजमीटरमध्ये फेरफार; रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:07 IST

महावितरणची कारवाई : इंदापूरमध्ये ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती : इंदापूर शहरात वीजवापरदाराच्या संगनमताने मीटरमध्ये फेरफार करून देणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील दोन जणांना साहित्यासह महावितरणच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या तिघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, की इंदापूर शहरातील जुने स्टेट बँक रस्ता परिसरात मंगळवारी (दि. २) सायंकाळी एका घरगुती वीजमीटरमध्ये फेरफार करण्यासाठी दोघेजण येत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे सहाय्यक अभियंता महेश पवार व कर्मचारी परिसरात आले.

वीजग्राहकाकडील मीटर उघडून त्यात फेरफार सुरु झाल्यानंतर महावितरणच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. दोनपैकी एकजण घराच्या वरच्या मजल्यावर पळून गेला तर दुसºयाला महावितरणच्या कर्मचाºयांनी पकडून ठेवले व पोलिसांना कळवले. पोलीसांनी तात्काळ येऊन वीजमीटरमध्ये फेरफार करणाºया या दोघांनाही ताब्यात घेतले. तसेच पंचनामा करून वीजमीटरमध्ये फेरफार करण्यासाठी त्यांनी आणलेले साहित्य जप्त करण्यात आले. यानंतर वीजमीटरमध्ये फेरफार करणारे माळशिरस तालुक्यातील (जि. सोलापूर) शब्बीर असगरअली भोरी ( रा. राऊतनगर, अकलूज) व राजेंद्र विठ्ठल लावंड, (रा. रामायण चौक, अकलूज) तसेच इंदापूर येथील प्रमोद (पप्पू) पलंगे या तिघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या मोहिमेत एकूण ४५ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली. या सर्वच १११ वीजचोरांविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे व बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता दत्तात्रय पडळकर, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी. के. कोरडे यांच्यासह सुमारे ५० अभियंते व कर्मचाºयांनी पाच पथके तयार करून तीन दिवस वीजचोरीविरोधात मोहीम राबविली.इंदापूर व बारामतीत ४५ लाखांची वीजचोरी उघडइंदापूर व बारामती शहर परिसरात ४५ लाखांची वीजचोरी उघड - महावितरणच्या बारामती विभाग अंतर्गत बारामती व इंदापूर तालुक्यात तसेच भिगवण महामार्ग परिसरातील हॉटेल्स, ढाबे तसेच इंदापूर शहरातील अनेक दुकाने, हॉस्पीटल्स अशा १११ ठिकाणी ४५ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे.महामार्गावरील मोठी हॉटेल, ढाबे तसेच बारामती व इंदापूर शहरातील संशयास्पद वीजवापर आढळून आलेली हॉस्पीटल्स, उद्योग व मोठी दुकाने अशा सुमारे ३०० वीजग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली.यामध्ये दोन ठिकाणी रिमोट कंट्रोलद्वारे वीजमीटरचा वापर कमी दाखविण्याचा प्रकार उघडकीस आला तर १०९ ठिकाणी मीटरमध्ये फेरफार करणे, वीजचोरीसाठी वेगळे सर्किट बसविणे आदी प्रकार आढळून आले. 

टॅग्स :electricityवीजPuneपुणे