शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला सत्तेतून घालवा - जी. रेड्डी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 01:05 IST

कामगारांचे आर्थिक, सामाजिक शोषण करीत भांडवलदारांना मोदी सरकार मदत करीत आहे. कामगारांविरोधी धोरण राबविणाऱ्या मोदी सरकारला आगामी निवडणुकीत सत्तेतून घालवायला हवे.

पिंपरी : कामगारांचे आर्थिक, सामाजिक शोषण करीत भांडवलदारांना मोदी सरकार मदत करीत आहे. कामगारांविरोधी धोरण राबविणाऱ्या मोदी सरकारला आगामी निवडणुकीत सत्तेतून घालवायला हवे. त्यासाठी देशभरातील कोट्यवधी कामगारांनी ८ व ९ जानेवारी, २०१९ ला पुकारलेल्या अखिल भारतीय संपात सहभागी व्हावे, असे आवाहन कामगार संघटना कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार जी. संजिवा रेड्डी यांनी केले.विविध क्षेत्रांतील कंत्राटीकरण, खासगीकरण रद्द करण्यासाठी देशभरातील कामगारांचा सर्व संघटनांच्या वतीने संप पुकारण्यात आला असून, त्याची घोषणा रेड्डी यांनी सोमवारी पिंपरी येथे केली. या वेळी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम, ज्येष्ठ कामगार नेते म. वि. अकोलकर, अजित अभ्यंकर, दिलीप पवार, मनोहर गाडेकर, अनिल आवटी, शशिकांत धुमाळ, वसंत पवार, अनिल रोहम, यशवंत सुपेकर,ृ आदी उपस्थित होते.या वेळी रेड्डी म्हणाले की, केंद्र सरकार सार्वजनिक बँका, रेल्वे, विमा, पोस्ट, आरोग्य, शिक्षण, औद्योगिक, सार्वजनिक आस्थापना, सरकारच्या आस्थापना, सरकारी व निम सरकारी महामंडळे यांसह संरक्षण क्षेत्रातदेखील कंत्राटीकरण करीत आहे.या संपात इंटक, आयटक, सिटू, एचएमएस, टीयूसीसी, एआययुटीयूसी, एआयसीसीटीयू, सेवा, युटीयूसी, एलपीएफ, राष्ट्रवादी कामगार सेल, श्रमिक एकता महासंघ, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, बँक, विमा, संरक्षण, पोस्ट, बीएसएनएल, केंद्र सरकारी कर्मचारी, वीज मंडळ, राज्य सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी, आशा, अंगमेहनती कष्टकरी, हमाल, वाहतूक, परिवहन, रिक्षा, पथारी, असंघटित सर्व कर्मचारी संघटना सहभागी होतील, अशीही माहिती रेड्डी यांनी दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणे