मोदी सरकारकडे काम करण्यासाठी टीमच नाही

By Admin | Updated: October 26, 2014 01:18 IST2014-10-26T01:18:25+5:302014-10-26T01:18:25+5:30

सरकारमध्ये काम करण्यासाठी जो संच असावा लागतो तो मोदी सरकारकडे नाही. मात्र, त्यांना थोडा वेळ आणि संधीही दिली पाहिजे.

Modi does not have a team to work with the government | मोदी सरकारकडे काम करण्यासाठी टीमच नाही

मोदी सरकारकडे काम करण्यासाठी टीमच नाही

शरद पवार : आमची भूमिका ‘वेट अॅण्ड वॉच’
बारामती (जि़ पुणो) :  सरकारमध्ये काम करण्यासाठी जो संच असावा लागतो तो मोदी सरकारकडे नाही. मात्र, त्यांना थोडा वेळ आणि संधीही दिली पाहिजे. त्यामुळे आताचा काळ हा ‘वेट अॅण्ड वॉच’ असा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
 दिवाळीनिमित्त बारामतीत व्यापारीवर्गातर्फे आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.  पवार म्हणाले, ‘‘देशात उसाचे उत्पादन समाधानकारक आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन ठीक होईल. इंधनात 5 ते 1क् टक्के इथेनॉल मिसळण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे. 
आजर्पयत आपण 2 ते 3 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकलो नाही. मात्र, केंद्र सरकार कशा पद्धतीने पाऊल टाकते, यावर हे अवलंबून आहे. केंद्र सरकार अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पाऊल 
टाकेल, असा समज आहे. लोकप्रियतेच्या संदर्भात लोकांच्यात समाधान होईल, असे निर्णय घेतल्यास वाईट परिणाम होतील. अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी खबरदारी घ्यावी लागते. मात्र, केंद्र सरकारबाबत इतक्यात निष्कर्ष काढणो योग्य नाही.’’
ते म्हणाले, ‘‘‘मॅन्युफ ॅक्चर’ क्षेत्रत चीन क्रमांक 1 वर आहे. त्यांच्याशी स्पर्धा करणो शक्य नाही. महासत्ता हे चीनचे स्वप्न आहे. चीन अर्थव्यवस्था आणि लष्कर असे दुहेरी मजबुतीकरण करीत आहे. चीनची लष्करी ताकद वाढल्यानंतर अनेकांमध्ये अस्वस्थता आहे. सीमा भागात चीनने रेल्वे, रस्त्यांची सुविधा निर्माण केली. आपण प्रतिकूल नैसर्गिक रचनेमुळे या सुविधा निर्माण करू शकत नाही. ते एखाद्या जीपद्वारेदेखील त्या ठिकाणी पोहोचू शकतात. त्याचवेळी आपल्याला विमानाने जाण्याशिवाय पर्याय नाही. या सर्वबाबींचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. या प्रश्नाबाबत राजकारण केले जात नाहीत. मात्र, नव्या सरकारची नीती, कृती यावर ब:याच गोष्टी अवलंबून आहेत.’’
गेल्या काही महिन्यांत जगातील विशेषत: आखाती देशातील इंधनाचे दर कमी होत आहेत. ही जमेची बाजू आहे. मात्र, ही परिस्थिती किती दिवस टिकेल याबाबत साशंकता आहे. अमेरिकेची तेलाची मोठी साठेबाजी सुरू असल्याचे पवार म्हणाले. (प्रतिनिधी)
 
शरद पवार यांचा ‘यू टर्न’
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकेची झोड उठविली होती. मात्र, पवार यांनी आता आपली भूमिका बदलेली पाहायला मिळतेय. विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येताच, पवारांनी भाजपाला विनाशर्त पाठिंबा देण्याची तयारी केल्यानंतर मोदीसरकारबाबत आत्ताच निष्कर्ष काढणो योग्य नाही, असे मत व्यक्त केले आहे. मोदीसरकार बरेच काही करणार असे दिसते, आपण आता चमत्कारिक काळातून जातोय. या सरकारला काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असे म्हणत त्यांनी मोदीसरकारची पाठराखण केली आहे.

 

Web Title: Modi does not have a team to work with the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.