शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक जग शास्त्राने भरलेल्या ज्ञानाची धनदौलत: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 13:01 IST

आपण नेहमी दुसऱ्याचे माप काढण्यातच वेळ घालवतो

ठळक मुद्देश्री महर्षी व्यास प्रतिष्ठानच्या वतीने राम डवरी कलागौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन देशातील १३० कोटींच्या लोकसंख्येत सात-आठ कोटी लोकांना मधुमेह

पुणे : माणसासमोर सध्याच्या धावपळीच्या आधुनिक जगात कसे जगावे, हा प्रश्न उभा राहिला आहे. जीवन हे एक गूढ आहे. त्यामध्ये सतत काहीतरी शोधत राहिले पाहिजे. आताचे आधुनिक जग ही शास्त्राने भरलेल्या ज्ञानाची धनदौलत आहे. प्रत्येक व्यक्तीने ज्ञानाचा उत्तम प्रकारे वापर करण्याचा विचार करावा, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. श्री महर्षी व्यास प्रतिष्ठानच्या वतीने चित्रपटनिर्माते राम डवरी कलागौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुरंदरे यांच्या हस्ते डॉ. जगन्नाथ दीक्षित, अभिनेत्री उषा नाईक, मधुरा वेलणकर, केजीएम कॉलेज संस्थापक डॉ. कल्याण जाधव यांना राम डवरी कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, नॅशनल शिपिंग बोर्ड अध्यक्ष प्रदीप रावत, नटवर्य डॉ. राम साठ्ये, श्री महर्षी व्यास प्रतिष्ठान अध्यक्ष दिगंबर डवरी आदी उपस्थित होते. 

पुरंदरे म्हणाले, ‘‘आपण नेहमी दुसऱ्याचे माप काढण्यातच वेळ घालवतो. जीवनात प्रत्येक गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. ते करताना माझ्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही, याचेही भान ठेवायला हवे. मनातील ईश्वराला विचारून जगायला शिका. सर्व वाईट विचारांपासून दूर राहा.’’ ०००मी चित्रपटसृष्टीत गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत आहे. ‘पिंजरा’ या चित्रपटापासून सुरुवात झाली. त्यांनतर मी मागे वळून पाहिले नाही. डवरी यांनी एका स्पॉटबॉयपासून कामाला सुरुवात केली. ते दिग्दर्शकापर्यंत पोहोचले. त्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळाली. मला राम डवरी यांच्या नावाने पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे.  उषा नाईक;  अभिनेत्री ०००देशातील १३० कोटींच्या लोकसंख्येत सात-आठ कोटी लोकांना मधुमेह आहे. मधुमेह कधी बरा होत नाही. तो आटोक्यात ठेवता येतो; पण भारतासारख्या देशात या आजारावरील उपचारांचा खर्च परवडत नाहीत. मधुमेह या आजारामुळे अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. माणसाने दोन वेळेसच जेवण करावे. त्यामुळे आपण शारीरिकदृष्ट्या उत्तम राहतो. मिळतंय म्हणून सतत खात राहणे, हे मानवी आरोग्यसाठी हानिकारक असते.                    डॉ. जगन्नाथ दीक्षित 

टॅग्स :PuneपुणेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेResearchसंशोधन