मॉडेल अर्शी खानचा पोलिसांविरुद्धच कांगावा!
By Admin | Updated: October 29, 2016 04:32 IST2016-10-29T04:32:56+5:302016-10-29T04:32:56+5:30
पुण्यात तीन दिवसांपूर्वी टाकलेल्या छाप्यात सापडल्यानंतर रेस्क्यू फाउंडेशनमधून पळून गेलेली मॉडेल अर्शी खान हिने पोलिसांविरुद्धच कांगावा केला आहे. पोलिसांनी १५ लाख रुपये

मॉडेल अर्शी खानचा पोलिसांविरुद्धच कांगावा!
पुणे : पुण्यात तीन दिवसांपूर्वी टाकलेल्या छाप्यात सापडल्यानंतर रेस्क्यू फाउंडेशनमधून पळून गेलेली मॉडेल अर्शी खान हिने पोलिसांविरुद्धच कांगावा केला आहे. पोलिसांनी १५ लाख रुपये आणि शरीरसंबंधांची मागणी केल्याचा आरोप तिने केला आहे. पुणे पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत.
हडपसर येथील रेस्क्यू फाउंडेशनमधून कर्मचाऱ्यांना मारहाण करून ती पळाली होती. पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीची मैत्रीण म्हणविणाऱ्या अर्शी खानने केलेल्या आरोपानुसार, ती अरोरा टॉवरमध्ये मित्रांना भेटायला आली होती. स्वत:च्या नावाने तिने रूम बुक केली होती. छापा टाकलेल्या पोलिसांनी अर्शीकडे १५ लाख रुपयांची मागणी केली होती. नकार दिल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. नकार दिल्यावर सुधारगृहात पाठविण्यात आलं. कर्मचाऱ्यांनी अर्शीकडून पैसे आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळी एक महिला पोलीस तेथे पोहोचली व अर्शीला जायला सांगितले.
बेकायदा वेश्याव्यवसाय प्रकरणी मॉडेलवर करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान व्हिडीओ शूटिंग करण्यात आलेले आहे. एजंट आणि ग्राहकामधले तसे एजंटमधील मोबाईल संभाषण, व्हॉट्सअॅप चॅटिंग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारवाईवेळी महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित होत्या. गुन्हा सिद्ध होण्याइतपत भक्कम पुरावे पोलिसांकडे आहेत. पोलिसांवर तसेच तपासावर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. संबंधित मॉडेल आरोपी नाही, तर पीडित आहे. त्यामुळे या विषयावर अधिक भाष्य करता येणार नाही. पोलिसांवरील सर्व आरोप धादांत खोटे आहेत. - पी. आर. पाटील, उपायुक्त गुन्हे शाखा