औद्योगिक क्षेत्रात दहशद करणाऱ्यांना मोक्का लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST2020-12-04T04:30:29+5:302020-12-04T04:30:29+5:30
जेजुरी: पुरंदर तालुक्यात विमानतळ होतोय, येथे भविष्यात मोठे उद्योग-धंदे येतील.औद्योगिक क्षेत्रामध्ये ब्लॅकमेल, खंडणीसारखे प्रकार घडतात.गुन्हेगारांच्या टोळ्यांना प्रतिकार करण्यासाठी चांगल्या ...

औद्योगिक क्षेत्रात दहशद करणाऱ्यांना मोक्का लावणार
जेजुरी: पुरंदर तालुक्यात विमानतळ होतोय, येथे भविष्यात मोठे उद्योग-धंदे येतील.औद्योगिक क्षेत्रामध्ये ब्लॅकमेल, खंडणीसारखे प्रकार घडतात.गुन्हेगारांच्या टोळ्यांना प्रतिकार करण्यासाठी चांगल्या लोकांच्याही टोळ्या हव्यात.गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी पोलीस कायम उद्योजकांच्या पाठीशी उभे राहतील असे आश्वासन भोर उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी दिले.
जेजुरी औद्योगिक वसाहतीमधील जिमा संघटनेच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. त्यांनी औद्योगिक वसाहतीमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत उद्योजकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,जिमाचे अध्यक्ष डॉ.रामदास कुटे, उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, कार्याध्यक्ष रवींद्र जोशी, माजी अध्यक्ष प्रकाश खाडे, व्यवस्थापक जालिंदर कुंभार आदी पन्नास उद्योजक उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक सुनील महाडिक म्हणाले, कामगार,उद्योजक व स्थानिक ग्रामस्थ यांच्यात समन्वय राहावा,ज्या कारखान्यात दहापेक्षा जास्त महिला काम करतात त्या ठिकाणी महिलांच्या न्यायासाठी विशाखा समितीची स्थापन करणे गरजेचे आहे. उद्योजकांनीही शासनाचे योग्य नियम पाळून व्यवसाय करणे गरजेचे असल्याचे सांगितले. दर तीन महिन्यांनी उद्योजक व पोलिस खाते यांची बैठक घेतली जाईल.
जिमाचे अध्यक्ष डॉ.रामदास कुटे यांनी काही उद्योगांना खंडणीखोरांकडून विविध मार्गाने त्रास देऊन ब्लॅकमेकिंग केले जात असुन पोलिसांनी अशा गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. जिमा संघटनेच्या माध्यमातून होत असलेल्या अनेक सामाजिक उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. उद्योजक नितीन गांधी, प्रकाश खाडे, रविंद्र जोशी, पांडुरंग सोनवणे, अमर कांबळे आदींची यावेळी भाषणे झाली. तीस वर्षापुर्वी जिमा संघटनेची स्थापना करणार्या भिकुलाल ताकवले काका यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
फोटो
०३ जेजुरी
भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील उद्योजकांशी चर्चा करताना