शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत दहशत माजविणाऱ्या नितीन तांबे टोळीला ‘मोक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 16:38 IST

हॉटेल चालकाला ‘मी एन. टी. भाई आहे.तू मला ओळखत नाहीस का? माझे पुण्यात भाई लोकांशी संबध आहेत.

बारामती: बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेलमध्ये खंडणी मागणाऱ्या नितीन तांबे टोळीविरूध्द मोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे.याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी माहिती दिली.

शिरगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार , बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत ७ फेब्रुवारी रोजी रात्री ०८:३० वा.ते ०९:४५ वा. दरम्यान यातील फिर्यादी त्यांचे स्नेहा गार्डन (फलटण रोड बारामती ता. बारामती ) हॉटेलवर होते.यावेळी हॉटेलमध्ये आरोपी नितीन बाळासो तांबे (रा.पाहणेवाडी ता.बारामती) तसेच आरोपी अमिन दिलावर इनामदार (वय २७, रा. कसबा,बारामती) व अनोळखी तीन साथीदार आले.

हॉटेल चालकाला ‘मी एन. टी. भाई आहे.तू मला ओळखत नाहीस का? माझे पुण्यात भाई लोकांशी संबध आहेत. तुला हॉटेल नीट चालवायचे असेल  तर दर महिन्याला माझा माणूस येईल. त्याचेकडे २५ हजार रुपये दर महिन्याला द्यायचे ,नाहीतर मी स्वत: एन. टी. भाई येईल लक्षात ठेव. तू जर आमच्यावर गुन्हा दाखल केला तर आम्ही जेलमध्ये बसु व जेलमधून तुझा गेम करू असे म्हणून ,दमदाटी केली.तसेच हॉटेल चालकास फिर्यादीस हाताने फाईट मारली. खिशातून चाकू काढत हप्ता नाही दिला तर हॉटेल बाहेर आल्यावर तुझे तुकडे पाडु अशी धमकी दिली.तसेच, धक्काबुक्की करून आरोपींनी हॉटेलच्या काउंटरमधील ७,२०० रुपये रोख रक्कम, हॉटेलचे लायसन्स एफ.एल.३-१६११, न्यु लिफ कंपनीचे घडयाळ असे जबरीने दरोडा टाकल्याची घटना घडली होती.

यातील आरोपी तांबे, इनामदार या दोघांसह गणेश संजय बोडरे (सर्व रा. बारामती ता. बारामती) व अनोळखी २ इसम यांच्यावर बारामती शहर व परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, खंडणी मागणी अशा स्वरूपाचे १३ गुन्हे संघटिपणे केल्याचे निष्पन्न झालेले आहेत. आरोपींवर मोकांअतर्गत कारवाई होण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आरोपींनी गुन्हयाचे स्वरूप पाहता त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाईकामी प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास शिरगांवकर करीत आहेत.पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक  नामदेव शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद पालवे, पोलीस अंमलदार अविनाश दराडे, अतुल जाधव, अंकुश दळवी यांनी ही कारवाई केली.कारवाईबाबत पोलीस अधिक्षक डॉ.देशमुख यांनी १५ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेArrestअटक