गुंड ओंकार गुंजाळसह पाच जनांवर मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:08 IST2021-06-06T04:08:47+5:302021-06-06T04:08:47+5:30

टोळीप्रमुख ओंकार शंकर गुंजाळ (वय २४, रा. समृध्दी पार्क, ढगे वस्ती, बकोरीरोड, लोणीकंद ता. हवेली) याच्यासह, प्रदीप उर्फ बाबू ...

Mocca on five people including goon Omkar Gunjal | गुंड ओंकार गुंजाळसह पाच जनांवर मोक्का

गुंड ओंकार गुंजाळसह पाच जनांवर मोक्का

टोळीप्रमुख ओंकार शंकर गुंजाळ (वय २४, रा. समृध्दी पार्क, ढगे वस्ती, बकोरीरोड, लोणीकंद ता. हवेली) याच्यासह, प्रदीप उर्फ बाबू यशवंत कोंढाळकर (वय २३, रा. सदगुरू पार्क, गल्ली नं. १, जोगेश्वरी रोड, केसनंद, ता. हवेली), इशाप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय १९, रा. यशवंत नगर, बकोरी फाटा, बीजेएस कॉलेज जवळ, वाघोली, ता. हवेली), गणेश रामदास काळे (वय ३२, रा. गोरेवस्ती रोड, वाघेश्वर गायरान, वाघोली, ता. हवेली ) व विजय नंदू राठोड (वय २२, रा. सुयोगनगर भावडी रोड, गायरान वस्ती, वाघोली, ता. हवेली) या पाच जणांना अटक केली आहे. आरोपींनी ३० एप्रिल रोजी वाघोली ग्रामपंचायत हद्दीतील उबाळेनगर येथे एका व्यक्तीला मारहाण करून १३ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम लुटली होती. वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने म्हणाले की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने सर्व आरोपींना गजाआड केले. त्यांची चौकशी केली असता. त्यंनी अनेक गुन्हे केले असल्याची कबुली दिली. यामुळे या पाच जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मान्यता दिली आहे.

Web Title: Mocca on five people including goon Omkar Gunjal