नीरेतील गोळीबार प्रकरणातील पाच जणांविरोधात मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:59+5:302021-09-02T04:24:59+5:30

नीरा : नीरा येथील कुख्यात गुंड गणेश रासकरचा १६ जुलै रोजी गोळ्या घालून खून झाला होता. रासकरच्याच मित्रांनी ...

Mocca against five people in Neeru shooting case | नीरेतील गोळीबार प्रकरणातील पाच जणांविरोधात मोक्का

नीरेतील गोळीबार प्रकरणातील पाच जणांविरोधात मोक्का

नीरा : नीरा येथील कुख्यात गुंड गणेश रासकरचा १६ जुलै रोजी गोळ्या घालून खून झाला होता. रासकरच्याच मित्रांनी त्याचा काटा काढला होता. गोळीबार करत खून करणाऱ्या पाच जणांविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती जेजुरी पोलिसांनी दिली आहे.

गणेश रासकर या गुन्हेगारांचा खात्मा करून स्वतःचं वर्चस्व नीरा भागात निर्माण करू पाहणाऱ्या गौरव जगन्नाथ लकडे याच्या टोळीला जेजुरी पोलीस ठाणेतर्फे संघटित गुन्हेगारी कायदा लागू करण्याबाबतचा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यामार्फत कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे सादर करण्यात आलेला होता. हा प्रस्ताव गौरव लकडे याचे साथीदार निखिल रवींद्र ढावरे, गणेश रासकर खुनाचा मास्टरमाईंड गणेश लक्ष्मण जाधव (रा. नीरा) व बेकायदा शस्त्र विक्री करणारा संकेत सुरेश कदम (रा. शिरवळ), अक्षय पाटील (रा. सांगली) यांच्यावर सुद्धा पाठवला होता. संघटित गुन्हेगारी कायद्याच्या कलमांना लावण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ मंजुरी दिली. मंजुरी दिल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्याकडे देण्यात आला.

Web Title: Mocca against five people in Neeru shooting case