चुहा गँगच्या म्होरक्यासह ५ जणांवर मोक्का कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST2021-07-23T04:09:10+5:302021-07-23T04:09:10+5:30

पुणे : खंडणी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्नासह गंभीर गुन्हे करुन कात्रज परिसरात दहशत निर्माण करणार्या चुहा गँगच्या म्होरक्यासह पाच ...

Mocca action against 5 people including the leader of Chuha gang | चुहा गँगच्या म्होरक्यासह ५ जणांवर मोक्का कारवाई

चुहा गँगच्या म्होरक्यासह ५ जणांवर मोक्का कारवाई

पुणे : खंडणी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्नासह गंभीर गुन्हे करुन कात्रज परिसरात दहशत निर्माण करणार्या चुहा गँगच्या म्होरक्यासह पाच जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान (वय २२), चंद्रशेखर ऊर्फ शेखर ठोंबरे (वय २४), तन्वीर जमीर सय्यद (वय २७), ऋतिक चंद्रकांत काची (वय वय १९, रा. चौघेही रा. संतोषनगर, कात्रज) व अझरुद्दीन दिलावर शेखर (वय २०, रा. अंजलीनगर, कात्रज) अशी अशी मोक्का कारवाई केल्यांची नावे आहेत.

साकीब चौधरी व त्याच्या साथीदारांनी ३ जुलै रोजी रात्री साडे आठ वाजता दत्ता नथू जाधव (वय ४४, रा. नवीन वसाहत, कात्रज) हे आरोपींच्या टोळीच्या हालचालींची माहिती पोलिसांना देतो, अशा संशयावरून आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी साकीब चौधरीसह त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक केली. आरोपी संघटीतपणे २०१७ पासून गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहेत. पोलिसांनी आरोपींवर हद्दपारीची कारवाई करूनही आरोपींमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांच्याविरुद्ध "मोका'अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे पाठविला. त्यानंतर शिंदे यांनी संबंधीत कारवाईला मंजुरी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Web Title: Mocca action against 5 people including the leader of Chuha gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.