पालखी सोहळ्यात ‘मोबाइल टॉयलेट’

By Admin | Updated: June 13, 2015 04:48 IST2015-06-13T04:48:18+5:302015-06-13T04:48:18+5:30

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ््यासाठी प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डस्तर निधीतून प्रत्येकी १ लाख रुपये घेऊन दीड

'Mobile Toilet' in Palkhi | पालखी सोहळ्यात ‘मोबाइल टॉयलेट’

पालखी सोहळ्यात ‘मोबाइल टॉयलेट’

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ््यासाठी प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डस्तर निधीतून प्रत्येकी १ लाख रुपये घेऊन दीड कोटी रुपयांच्या मोबाइल टॉयलेटची खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. पालखी सोहळा पूर्ण होईपर्यंत ही मोबाइल टॉयलेट दिंडीप्रमुखांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. यामुळे वारकऱ्यांची मोठी सोय होणार असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली.
या वेळी स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, भाजपचे गटनेते गणेश बिडकर, मनसे गटनेते बाबू वागस्कर, शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप उपस्थित होते.
पालखी आगमनानिमित्त पालखी महामार्गावरील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पाणीपुरवठा विभागाकडून वारकऱ्यांन पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक ती मंडप व्यवस्था, विद्युत व्यवस्था संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात येणार आहे. वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाकडून अँब्युलन्स व डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. दवाखान्यांमध्ये बेड राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: 'Mobile Toilet' in Palkhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.