मोबाइल चोरणाऱ्या महिलेस कोठडी

By Admin | Updated: January 9, 2017 03:33 IST2017-01-09T03:33:56+5:302017-01-09T03:33:56+5:30

रेल्वेतील गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधील १४ हजार ८४० रुपयांचा मोबाइल चोरणाऱ्या महिलेस रेल्वे पोलिसांनी अटक केली.

Mobile stealer stolen | मोबाइल चोरणाऱ्या महिलेस कोठडी

मोबाइल चोरणाऱ्या महिलेस कोठडी

पुणे : रेल्वेतील गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधील १४ हजार ८४० रुपयांचा मोबाइल चोरणाऱ्या महिलेस रेल्वे पोलिसांनी अटक केली. तिला ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
मीनाबाइ शिवा माने (वय २५, रा. चकपानी झोपडपट्टी, भोसरी) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत धनश्री दत्तात्रय पवार (वय २५, रा. भांगरवाडी, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे. पवार या २४ फेब्रुवारी २०१५ रोजी लोणावळा पुणे लोकलने प्रवास करत असताना आरोपी मीना हिने त्यांच्या पर्समधील मोबाइल चोरला.
आरोपीस न्यायालयात हजर केले असता, सरकारी वकील वामन कोळी यांनी तिच्याकडून चोरलेला मोबाइल हस्तगत करायचा आहे, इतर साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. तिच्या वास्तव्याची शहानिशा करायची आहे आणि अशा प्रकारे आणखी चोऱ्या केल्या आहेत काय? याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मागितली. ती न्यायालयाने मान्य केली.
(प्रतिनिधी)

Web Title: Mobile stealer stolen