शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

‘मोबाईल’मुळे वाढला बहिरेपणाचा धोका :  डॉ. कल्याणी मांडके 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 6:08 PM

२०२२ पर्यंत ही स्मार्ट मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या ४४ कोटींच्या पुढे जाणार

ठळक मुद्देविज्ञान परिषद व रसायनशास्त्र विभागातर्फे व्याख्यान

पुणे : आजघडीला भारतात जवळपास ३८ कोटी भ्रमणध्वनी वापरात आहेत. त्यातील ४० टक्के स्मार्टफोन असून, २०२२ पर्यंत ही संख्या ४४ कोटींच्या पुढे जाईल. तरुणाई फोनचा वापर प्रामुख्याने संगीत व इतर करमणुकीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी करते. स्मार्टफोनच्या अतिवापराने श्रवणदोष होण्याचा धोका अधिक असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ११० कोटी तरुण व्यक्तींना श्रवणक्षमता कमी होण्याचा धोका आहे, असे प्रतिपादन श्रवणतज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी व्यक्त केले.जागतिक श्रवण दिनाचे औचित्य साधून मराठी विज्ञान परिषद व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्यासाठी आनंददायी आणि सुरक्षित श्रवण’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. मांडके बोलत होत्या. रसायनशास्त्र विभागात झालेल्या या व्याख्याना वेळी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, उपाध्यक्ष व व्याख्यानाच्या समन्वयक डॉ. नीलिमा राजूरकर, सदस्य डॉ. सुजाता बरगाले, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. मोहन कुलकर्णी, डॉ. कुमारी दिम्या, तन्मय इलमे, गणेश शिंदे, पूजा ढोरगे आदी उपस्थित होते.डॉ. मांडके म्हणाल्या, ‘‘जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार सुमारे ४६ कोटींपेक्षा जास्त व्यक्ती श्रवणदोषाने बाधित आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे याची व्याप्ती वाढतच असून, त्यावर नियंत्रणासाठी जनजागृती आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने ३ मार्च हा दिवस ‘जागतिक श्रवण दिन’ म्हणून घोषित केला असून, त्याची संकल्पना ‘जीवनासाठी श्रवण : श्रवणदोषाने तुमचे आरोग्यदायी जीवन मर्यादित करू नका,’ अशी आहे. आवाजाची तीव्रता आणि वापर श्रवणाची सुरक्षित पातळी ठरवतात. जास्त काळासाठी इअरबड वापरायचे झाल्यास आवाजाची तीव्रता कमी ठेवणे हितावह असते.’’प्रा. मोहन कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तन्मय इलमे, गणेश शिंदे, पूजा ढोरगे, डॉ. कुमारी दिम्या यांनी जनजागृतीसाठी श्रवणसंबंधित विषयांवर भित्तिपत्रकाद्वारे सादरीकरण केले आणि उपस्थितांची श्रवण चाचणी घेतली.००० 

टॅग्स :PuneपुणेMobileमोबाइलHealthआरोग्य